अभिनेत्रींचा चित्रपटातील जलवा पाहून अनेक प्रेक्षक घायाळ होत असतात. या अभिनेत्री त्यांच्या अभिनयाची, नृत्याची चुणूक किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमातून दाखवत असतात. यामधून त्या बक्कळ पैसे कमवतात. या अभिनेत्री केव्हा चित्रपट किंवा जाहिरातील मधूनच नव्हे तर बिजनेस मधून पैसे कमावत आहेत. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या चित्रपटांसोबत त्यांचा साइड बिझनेस सुद्धा करत आहेत. चला तर जाणून घेऊ कोण आहेत त्या अभिनेत्री !

दीपिका पादुकोण – सध्याची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पादुकोण एक चित्रपट करण्यासाठी करोडो रुपये फि घेते. माहित आहे का दीपिका जितकी यशस्वी अभिनेत्री आहे तितकीच ती एक यशस्वी बिझनेस वुमन सुद्धा आहे. दिपीकाचा फॅशन सेन्स नेहमीच तिच्या चाहत्यांचा आकर्षण बिंदू असतो. त्यामुळे दीपिकाने काही वर्षांपूर्वी तिची स्वतःची ऑनलाईन फॅशन ब्रँड ऑल अबाऊट यु लॉन्च केला होता. तिचा हा ऑनलाइन फॅशन प्लॅटफॉर्म मिंत्रा या ऑनलाईन साइटवर उपलब्ध आहे.

अनुष्का शर्मा – अनुष्का शर्मा ही एक उत्कृष्ट अभिनेत्री सोबत एक यशस्वी बिझनेसवुमन सुद्धा आहे. अनुष्काने तिच्या भावासोबत क्लीन स्लेट फिल्म्स ही प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्यूशन कंपनी उघडली. अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत एन एच १०, फिल्लौरी, परी यांसारखे चित्रपट निर्मित केले. एवढेच नव्हे तर तिने यावर्षी पाताळलोक या वेब सिरीज ची निर्मिती करून वेब दुनियेत पाऊल ठेवले. याव्यतिरिक्त Nush हा अनुष्काचा एक क्लोथिंग ब्रँड आहे.

सनी लियोनी – बाहेरील देशातील असून सुद्धा बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सनी लियोनी बिझनेस च्या बाबतीत सुद्धा मागे नाही. सनी ही एक अडल्ट स्टार आहे त्यामुळे तिने बिझनेस सुद्धा अडल्ट वस्तूंचा सुरु केला आहे. सनी तिच्या बिजनेस मध्ये अडल्ट टॉईज, ॲक्टिव कॉस्च्युम, पार्टीवेअर, स्विमवेअर यांसारख्या वस्तू विकते. याव्यतिरिक्त सनी लस्ट या नावाने परफ्यूम आणि कॉस्मेटिक गोष्टींची विक्री सुद्धा करते.

सुष्मिता सेन – एकेकाळची विश्वसुंदरी असलेली भारतीय अभिनेत्री सुष्मिता सेनच्या अभिनयाची जादू मोठ्या पडद्यावर सगळ्यांनीच पाहिली आहे. मात्र अभिनयाव्यतिरिक्त सुष्मिता बिझनेसवुमन सुद्धा आहे. सुष्मिता चा स्वतःचा एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे. सुष्मिता चा हा बिजनेस तिची आई सांभाळते. याव्यतिरिक्त सुष्मिता ची तंत्र इंटरटेनमेंट नावाची एक प्रोडक्शन कंपनी आहे.

कॅटरीना कैफ – बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. पण याव्यतिरिक्त कॅटरिना बिझनेसवुमन सुद्धा आहे. कॅटरीनाने भारतीय सौंदर्य रिटेलर नायका सोबत पार्टनरशिप मध्ये स्वतःचा काय हा ब्युटी ब्रँड लॉन्च केला आहे. कॅटरीना च्या कंपनीचे ब्युटी प्रॉडक्ट मुलींमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *