सिरम इन्स्टिटयूटचे CEO आदर पुनावाला यांची लाईफस्टाईल बघून वेडे व्हाल !

67

२०२० चा संपुर्ण बट्याबोळ कोरोनामुळे झाला. प्रत्येकजण या साथीच्या रोगामुळे बेजार झालेले. कधी एकदाचे या रोगावर औषध येते असे सगळ्यांना झाले. त्यामुळे जगभरातील विविध देशांत या रोगावर व्हॅक्सिन शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले. काही देशांनी यावर व्हॅक्सिनपण बनवल्या. भारतात सुद्धा लवकरच कोरोनावर व्हॅक्सिनेशन लवकरच द्यायला सुरुवात करणार आहे.

ड्र*ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडीया ने आपातकालीन उपयोगासाठी सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडीयाच्या कोविशिल्ड, आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला परवानगी दिली आहे. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया भारतासाठी एक्स्ट्राजेनेका- ऑक्सफोर्डची कोविशिल्ड व्हॅक्सिन तयार करत आहे. डीसीजीआयने या व्हॅक्सिनला मंजुरी दिल्यावर या कंपनीचे सीइओ अदार पूनावाला चर्चेत आले आहेत. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठ्या व्हॅक्सिन निर्माण करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.

अदार पूनावाला हे व्हॅक्सिन किंग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या साइरस पूनावाला यांचा मुलगा आहे. अदार यांचे शिक्षण परदेशात कॅंटरबरी येथील सेंट एडमंड स्कुलमध्ये झाले. यानंतर त्यांनी वेस्टमिंस्टर युनिव्हर्सिटी मधुन बिझनेस ग्रॅज्युएशन केले. परदेशात शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते २००१ मध्ये भारतात परतले आणि सीरम इंस्टिट्युट मध्ये काम करु लागले. २०११ मध्ये ते कंपनीचे सीइओ झाले.

जहाजात बनवले आ्रहे ऑफिस – अदार पुनावाला त्यांच्या लग्झरी लाइफ स्टाइलसाठी सुद्धा ओळखले जातात. सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाचे कॅम्पस १०० एकरात पसरले आहे. तर या व्यतिरीक्त अदार पुनावाला यांचे स्वत:चे २०० एकर जागेत फार्महाऊस सुद्धा आहे. एका न्युज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार पूनावाला यांचे स्वत:चे ऑफिस सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या जहाजात आहे.

प्रायव्हेट जेट पासुन ते महागड्या गाड्यांचे आहेत मालक – पूनावाला मुंबई ते पुण्याला असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये ये जा करण्यासाठी हेलिकॉप्टरचा उपयोग करतात. त्यांच्याकडे त्यांचे प्रायव्हेट जेट सुद्धा आहे. अदार पुनावाला महागड्या गाड्यांचे मोठे शॉकिन असल्यामुळे त्यांच्याकडे ३५ क्लासिक कारचे कलेक्शन आहे. त्यामध्ये विंटेज सिल्वर क्लाउड आणि फॅंटम रॉल्स-रॉयल्स यांसारख्या गाड्यांचा सुद्धा समावेश आहे.

व्हॅक्सिन प्रिंस म्हणुन ओळख असलेल्या अदार पुनावाला यांनी नताशा पुनावाला सोबत लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची ओळख २००१ मध्ये गोव्यात झालेल्या एका न्यु इअर पार्टीत झाली होती. ही पार्टी विजय माल्ल्या यांनी आयोजित केली होती. त्यानंतर काही वर्षांनी नताशा आणि अदार यांनी लग्न केले.

नताशा पुनावाला यांचे अनेक बॉलिवुड सेलिब्रेटींचे चांगले संबंध आहेत. अभिनेत्री प्रियंका चोपडा व तिचा पती निक जोनस हे त्यांचे चांगले मित्र आहेत. नताशा सध्या सिरम इंस्टिट्युट ऑफ इंडीयाच्या एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर पदी कार्य करतात. या व्यतिरिक्त त्या विल्लु पुनावाला फांउंडेशन सुद्धा चालवतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !