आजकालच्या धावत्या जीवनशैलीत आपण झटपट आणि चमचमीत पदार्थांवर ताव मारण्याकडे जास्त भर देतो. हे पदार्थ जरी तुमचा वेळ वाचवत असेल आणि तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असेल तरीही यामुळे होणारे अपाय आपल्या शरिराला सहन करावे लागतात. या पदार्थांमुळे अनेकदा अॅसिडीटीचा त्रास होतो. यावर उपाय आम्ही तुम्हाला आजच्या लेखाद्वारे सांगणार आहोत.

अडुळसा हे एक औषधी झाड आहे. हे झाड आशियात मोठ्या प्रमाणावर उगवते. या औषधी झाडाचा उपयोग आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्धा आणि युनानी चिकित्सेसाठी केला जातो. हे झाड आकाराने जरी छोटे असले तरी त्याचा उपयोग औषध बनवण्यासाठी वर्षानुवर्षे केला जात आहे. या झाडाच्या पानासकट ते अगदी मुळा पर्यंत वेगवेगळ्या आजारांवर उपयोग होतो. या झाडाची पाने, फुले, मुळ, साल या सर्व गोष्टींचा हजारो वर्षांपासुन आयुर्वेदात वापर केला जातो. या झाडामध्ये जीवाणुरोधी, सुज कमा करणे, रक्त शुद्ध करणे यांसारखे गुण असतात. अडुळसा सामान्यता अस्थमा, सर्दी, खोकला अशा समस्यांसाठी वापरतात. पण याव्यतिरिक्त सुद्धा या झाडाचे फायदे आहेत.

सर्दी-खोकल्यापासुन सुटका – जर कोणाला सर्दी खोकल्याचा खुप त्रास होत असेल तर अशा लोकांसाठी अडुळसा उत्तम औषध आहे. यासाठी या झाडाची ७-८ पाने पाण्यात उकळा आणि मग ते पाणी गाळुन त्यात मध मिसळुन प्या.

वायरस संक्रमणावर उपाय – अडुळसामध्ये एंटीवायरल औषधी गुण असतात. हे वायरल संक्रमणाविरोधात लढण्यास मदत करतात. हे शरीराचे तापमान कमी करते. बंद नाक खोलते यामुळे श्वासासंबंधी समस्या दुर होतात.

अॅसिडीटी दुर करते – अॅसिडीटीमुळे पोटात जळजळ होते. आम्ली पदार्थांचे सतत सेवन करणे हे अॅसिडीटीचे प्रमुख कारण असते. यासाठी अडुळसा फायदेशीर ठरु शकतो. यासाठी अडुळशाची पावडर, जेष्ठमधाची पावडर, आणि आवळ्याची पावडर समान मात्रेत घेऊन मिक्स करा आणि त्याचे दररोज सेवन करा.

ब्रोंकाइटिससाठी उपाय – ब्रोंकाइटिस मध्ये ब्रोन्कियल ट्यूब्स म्हणजे श्वासनलिका, तोंड, नाक, फुप्फुस यांमधील वायुनलिकेला सुज येणे. यामध्ये खोकला येतो, घशात कफ जमा होतो. या आजारामुळे हलका ताप, छातीत जळजळ, श्वास घेण्यास त्रास यांसारख्या समस्या उद्भवतात. अडुळस्याचे सेवन केल्यास या वायुमार्गाना खोलण्यास मदत होते. यामुळे श्वासासंबंधी त्रास, खोकला यांपासुन सुटका मिळते.

घशात खवखव – हवामानात बदल झाले कि सर्दी, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. घशातील खवखवी सोबत घसा दुखणे, जळजळ आणि खाज येते. अडुळसामध्ये असलेले एंटीवायरल, एंटीइंफ्लेमेटरी आणि एंटीबैक्टीरियल कम्पाउंड घशातील खवखव थांबवण्यास मदत करतात.

सांधेदुखी – अनेकांना सांधेदुखीसारख्या समस्येने भेडसावले असते. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण होतात. अनेकदा शरीरातील युरीक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे या समस्या निर्माण होतात. अडुळसा हे युरीक अॅसिडचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. तसेच या वनस्पतीत असलेले एंटी-इंफ्लेमेटरी गुण सांध्यांमधली सुज उतरवण्यास सुद्धा मदत करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *