बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानने नुकताच तिचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. फराह ने ‘मै हू ना’ या चित्रपटातून दिग्दर्शन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर तिने काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील साकारला. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या पहिल्या चित्रपटात फराहने काजलच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान फराह करणच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते. त्यावेळी ती अर्ध्या रात्री करणच्या खोलीत घुसली होती.

करण आणि फराह खान ची मैत्री खूप जुनी आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. कुछ कुछ होता है या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलॅंड मध्ये चालू होते. त्यावेळी अचानक एके रात्री फराह करणच्या रूम मध्ये घुसली आणि त्याच्या खोलीत भू*त असल्याचे करण ला सांगितले.

करण ने एका इंटरव्यू मध्ये सुद्धा आहे सांगितले होते की, फराह मध्यरात्री माझ्या खोलीत घुसून तिच्या खोलीत भूत असल्याचे सांगत होती. त्यावेळी त्याने तिला म्हटले की, भू*तां सोबत कविता म्हणणारा मी आहे का? मी तुला मूर्ख वाटतो की मी तुझ्या बोलण्यात येईन?

साजिद खान आणि रितेश देशमुख यांच्यासोबत ‘यारो की बारात’ या चॅट शोमध्ये फराह ला मी आवडायचो तिने मला लग्नासाठी प्रपोज सुद्धा केले होते असे करणने सांगितले होते. तर फराहने सुद्धा ही गोष्ट एका इंटरव्यू मध्ये कबूल केली होती. फराहने जेव्हा करण ला लग्नासाठी प्रपोज केले त्यावेळेस एक टेक्निकल खराबी आहे असे करणने उत्तर दिले होते.

मात्र त्यानंतर फराहने २००४ मध्ये शिरीष कुंदर सोबत लग्न केले. विशेष म्हणजे फराह शिरीष पेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे. फराह आणि शिरीष ला तिळी मुलं आहेत. या मुलांची नावे फराहने दिवा, अन्या आणि सिजार अशी ठेवली. तर करण जोहरला टेस्ट ट्यूब बेबी मार्फत दोन जुळी मुलं झाली. त्यांची नावे रुही आणि यश अशी आहेत. विशेष म्हणजे करण त्याच्या दोन्ही मुलांची सिंगल फादर म्हणून काळजी घेतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *