पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी मकरसंक्रात हा सण साजरा केला जातो. दरवर्षी मकरसंक्रात ही जानेवारी मध्ये १४ किंवा १५ तारीखला साजरी केली जाते. यावर्षी हा सण १४ जोनेवारी ला साजरा होणार आहे. असे म्हटले जाते कि सूर्यदेव या दिवशी त्यांचा मुलगा शनिदेवाला भेटायला जातो. या पर्वात सूर्य आणि शनीचे संबंध द्रुढ होतात. त्यामुळे हा काळ महत्वाचा असतो. साधारण याच काळात शुक्राचा सुद्धा उदय होतो. यानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते.
मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान-पुण्य यांसारख्या कार्यांना विशेष महत्व असते. या दिवशी केले गेले दान हे अक्षय फलदायी असते. या दिवशी शनि देवासाठी प्रकाशाचे दान करणे शुभ मानले जाते. चला तर जाणुन घेऊ मकरसंक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टीचे दान केल्यामुळे सुख-सम़द्धी मिळते.
१. तीळ – मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळाचे दान केल्यास विशेष महत्व प्राप्त होते. या दिवशी ब्राम्हणांना तीळापासुन बनलेल्या गोष्टींचे दान केल्यास पुण्य लाभते. या व्यतिरिक्त या दिवशी विष्णु, सूर्य आणि शनिदेवाची तीळाने पुजा करावी. असे म्हटले जाते कि शनि देवाने त्याच्या रागावलेल्या वडिलांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची काळ्या तीळांनीच पुजा केलेली त्यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले होते. मकरसंक्रांतीच्या दिवशी तीळाचे दान केल्यास शनि दोष सुद्धा दूर होतात.
२. चादरी – या दिवशी गरजुंना चादरींचे दान जरुर करा. यादिवशी चादरींचे दान करणे शुभ मानले जाते. असे म्हटले की मकरसंक्रांतीच्या दिवशी चादरींचे दान केल्यास राहुचा अशुभ प्रभाव पडत नाही.
३. खिचडी – मकरसंक्रांतीला खिचडी सुद्धा म्हणतात. या दिवशी खिचडीचे दान करणे खुप शुभ मानले जाते. कोणा गरजु व्यक्तीस या दिवशी उडदाच्या डाळीपासुन तयार केलेली खिचडी खाऊ घालतात. असे म्हटले की मकरसंक्रांतीच्या दिवशी उडदाच्या डाळीचे दान केल्यास शनि दोष निघुन जातो.
४. तूप – सूर्य आणि गुरुला प्रसन्न करण्यासाठी तूप भरपुर शुभ मानले जाते. या दिवशी गुरुवारीच मकर संक्रात आल्यामुळे तुप दान करण्याचे महत्व आणखी वाढते. या दिवशी शुद्ध तुपाचे दान केल्यास घरात सुख- समृद्धी नांदते.
५. वस्त्र – या दिवशी वस्त्र दान करणे महत्वाचे मानले जाते. त्यामुळे मकरसंक्रातीला एका तरी गरजु व्यक्तीला नवीन कपडे दान करावेत. या दिवशी केले गेलेले वस्त्र दान हे महादान मानले जाते.
६. गुळ – गुरुला गुळ खुप प्रिय असतो असे म्हणतात. शिवाय या दिवशी मकरसंक्रात गुरुवारीच आहे त्यामुळे या दिवशी गुळ दान आवश्य करावे. यामुळे तुमच्यावर गुरुची कृपादृष्टी कायम राहिल. या दिवशी तुम्ही तीळ आणि गुळापासुन बनलेले लाडुसुद्धा दान करु शकता. या दिवशी गुळ खाणे शुभ असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडीताला विचारावे धन्यवाद. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.