अजय देवगनने कपिल शर्माला त्याच्या पत्नी बद्दल असा काही प्रश्न विचारला की, ज्यामुळे त्याची बोलती झाली बंद !

77

छोट्या पडद्यावर अनेक मालिका, रियालिटी शो यांचे प्रसारण होत असते. या कार्यक्रमांचे टीआरपी रेट दर आठवड्याला बदलत असतात पण ‘द कपिल शर्मा शो’ हा कॉमेडी कार्यक्रम टीआरपीमध्ये नेहमीच अव्वल स्थानावर असतो. या कार्यक्रमात दर आठवड्याला चित्रपटांमधील कलाकार येतात आणि कपिल शर्मा सोबत भरपूर मस्ती करतात.

काही दिवसांपूर्वीच या शोमध्ये अभिनेता अजय देवगण आणि अभिषेक बच्चन पाहुणे कलाकार म्हणून आले होते. त्यावेळी या दोघांनी कपिल शर्मा सोबत भरपूर मस्ती केली. यावेळी मस्ती मस्ती मध्ये अभिनेता अजय देवगणने कपिल शर्माला असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे त्याची बोलतीच बंद झाली.

अजय देवगण आणि अभिषेक बच्चन ने कपिल शर्माचा शो मध्ये येऊन अर्णा पुरण सिंह सोबत भरपूर मस्ती केली. सोबतच त्यांनी काही किस्से सुद्धा ऐकले. यावेळी दोन्ही अभिनेत्यांनी मिळून कपिल शर्माची भरपूर मजा उडवली. या शोमध्ये अजयने कपिला त्याच्या पत्नी बद्दल एक प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर कपिल देऊ शकला नाही आणि त्याने विषय बदलण्याची विनंती केली.

द कपिल शर्मा शो मध्ये अनेक सेलिब्रिटी त्यांच्या प्रमोशन साठी येतात. यामध्ये अनेक अभिनेत्री सुद्धा असतात. यामध्ये कपिल नेहमीच त्या अभिनेत्रींबरोबर फ्लर्ट करत असतो. मात्र जेव्हापासून कपिलचे लग्न झाले आहे तेव्हापासून त्याचे फ्लर्ट करणे थोडे कमी झाले आहे. यामुळेच अजयने त्याची खिल्ली उडवली.

अजय ने कपिलची मजा घेत म्हटले की सोशल मीडियावर लोकांच्या कमेंट असतात की त्यांना कपिलची फ्लर्टींग खूप आवडते. असे म्हटल्यावर अजयने जेव्हा कपिलकडे बघितले तेव्हा कपिलने सुद्धा ही गोष्ट मान्य केली. तो म्हणाला की हो लोक मी केलेली फ्लर्टींग खूप मिस करतात. कपिलचे हे बोलणे ऐकून अजय लगेच तुझ्या बायकोला आवडते का असे विचारले. यावर कपिलची बोलतीच बंद झाली आणि नंतर त्याने तो विषय बदलण्याची विनंती केली. कपिल चे असे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण पोट धरून हसू लागले.

अभिषेक आणि अजय देवगन द कपिल शर्मा शो मध्ये द बिग बुल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. या चित्रपटात प्रमुख भूमिका अभिषेक बच्चन साकारली आहे तर अजय देवगण या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. हा चित्रपट हर्षद मेहता स्कॅमवर आधारित आहे. अभिषेक बच्चन या चित्रपटात हर्षद मेहता ची भूमिका साकारणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !