बॉलिवुड सेलिब्रेटी म्हटलं कि त्यांचे नखरे, ग्लॅमर, उंची राहणीमान, भरमसाठ पैसा या गोष्टी आफसुकच येतात. लोकांनासुद्धा हे सेलिब्रेटी कुठे राहतात, काय करतात, काय खातात यांसारख्या गोष्टींमध्ये भारी इंटरेस्ट असतो. एवढेच नाही तर या सेलिब्रेटींचे पार्टनर कोण, त्यांची मुलं काय करतात, त्यांचे शिक्षण किती या गोष्टींची माहितीसुद्धा सर्वसामान्यांना हवी असते. ही इंडस्ट्री इतकी मोठी आहे की इथे कधी कोण कोणाच्या प्रेमोत पडेल. व त्यांना किती मुले होतील हे सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला या सेलिब्रेटींच्या मुलांबद्दल सांगणार आहोत !

1. अमीर खान – बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शिनिस्ट अभिनेता अमीर खानने त्याच्या खऱ्या आयुष्यात दोन लग्ने केली. अमीरचे पहिले लग्न रिना दत्ता यांच्या झाले. या जोडप्याला इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. रिना दत्ता सोबत घट*स्फो*ट झाल्यानंतर अमीरने किरण राव सोबत लग्न केले. आता किरण राव व अमीरला आजाद नावाचा मुलगा आहे. असे म्हटले जाते कि अमीरची मुलगी इरा बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असुन तिचा भाऊ जुनैद मात्र लाइमलाइट पासुन दूर राहणे पसंत करतो.

2. सैफ अली खान – बॉलिवुडचा नवाब म्हणजेच अभिनेता सैफ अली खानने त्यावेळी सगळ्यांच्या विरोधात जावुन त्याच्याहुन 12 वर्षांनी मोठी असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न जास्त काळ टिकु शकले नाही. आणि या दोघांचा घट*स्फो*ट झाला. पण या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. या मुलांबद्दल विशेष सांगायचे झाल्यास सारा अगदी तिच्या आईसारखी म्हणजेच अभिनेत्री अमृता राव सारखी दिसते. तर इब्राहिम सैफ अली खानचा डुब्लिकेट वाटतो.

सैफने २०१२ ला अभिनेत्री करीना कपुर सोबत दुसरे लग्न केले. करीना आणि सैफला तैमुर हा 4 वर्षांचा मुलगा आहे. तसेच करीना पुन्हा गरोदर असुन त्यांचे दुसरे बाळ फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जन्माला येईल असा अंदाज बांधला जात आहे. म्हणजेच सैफ अली खानला तब्बल ४ मुले होतील.

3. संजय दत्त – बॉलिबुडमध्ये बाबा या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता संजय दत्त याला सुद्धा तीन मुले आहेत. संजयच्या मोठ्या मुलीचे नाव त्रिशाला दत्त असे आहे. संजय दत्तने १९८७ मध्ये रिचा शर्मासोबत लग्न केले होते. पण रिचाचा ब्रेन ट्युमर मुळे अकाली मृत्यू झाला. त्यानंतर संजयने मान्यता दत्त सोबत लग्न केले. या दोघांना एक मुलगा व एक मुलगी अशी जुळी मुले आहेत.

4. धर्मेंद्र – एकेकाळचा सुपरस्टार अभिनेता धर्मेंद्र यांना २ मुलगे व ४ मुली अशी सहा मुले आहेत. धर्मेंद्र यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासुन बॉबी देओल, सनी देओल, अजेता देओल, विजेता देओल ही चार मुले आहेत. तर दुसरे लग्न हेमा मालिनीसोबत झाल्यावर त्यांना आहना देओल आणि ईशा देओल या दोन मुली झाल्या.

5. शाहरुख खान – बॉलिवुडचा रोमान्सचा बादशहा म्हणुन प्रसिद्ध असलेला अभिनेता शाहरुख खानला तीन मुले आहेत. शाहरुख व गौरी खान यांच्या मुलीचे नाव सुहाना तर मुलाचे नाव अबराम असे आहे. त्यानंतर हे कपल सरोगसी द्वारे पुन्हा एकदा आईबाबा झाले. त्यांना तिसरा मुलगा झाला त्याचे नाव अबराम असे आहे.

6. शत्रुघ्न सिन्हा – अभिनेता शत्रुघ्न सिन्हाला सुद्धा तीन मुले आहेत. यांना लव-कुश हीदोन जुळी मुले आहेत. सोनाक्षी ही मुलगी आहे. सोनाक्षी ही बॉलिवुडची आघाडीची नायिका आहे. तिने सलमान खानसोबत दबंग या चित्रपटातुन पदार्पण केले होते.

7. अनिल कपूर – चिरतरुण अभिनेता म्हणुन ख्याती असलेले अनिल कपुर यांना सुद्धा तीन मुले आहेत. अनिल कपूर यांनी सुनिता सोबत १९८४ मध्ये लग्न केले. त्यांना सोनम कपूर आणि रिया कपूर, व एक मुलगा हर्षवर्धन अशी तीन मुले झाली. यामध्ये सोनम कपुर ही बॉलिवुडची नामांकित अभिनेत्री आहे तर रिया निर्माती आहे. तर मुलगा हर्षवर्धन हा सुद्धा एक बॉलिवुड अभिनेता आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *