थंडीच्या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तीळ, शेंगदाणे यांसारख्या पिष्टमय पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. पण यासोबतच शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी गुळाचा चहा घेणे कधीही उत्तम. गुळ सगळ्याच्या घरात असणारा पदार्थ आहे. साखरेपेक्षा गुळ आरोग्यास उत्तम असते. त्यामुळे वजन कमी होण्यापासुन इतर अनेक फायदे मिळतात. सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अशा कालावधीत शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी गुळाचा चहा प्यावा.

गुळाचा चहा तयार करण्यासाठीचे साहित्य – गूळाचा चहा बनवण्यासाठी 3 चमचे बारीक गूळ आणि 2 चमचे चहाची पावडर, 2 वेलची आणि 1 चमचा बडीशेप, एक कप पाणी आणि दोन कप दूध, अर्धा चमचे काळी मिरी पावडर आणि आले.

कृती – भांड्यात एक वाटी पाणी गरम करून वेलची, मिरपूड, आले, एका चमचा बडीशेप त्यात घाला व उकळा. जेव्हा ते उकळण्यास सुरुवात होईल तेव्हा त्यात दूध घाला आणि पुन्हा उकळवा. त्यात गूळ घाला आणि गूळ विरघळेपर्यंत मिश्रण चांगले ढवळा. गुळाचा चहा तयार असेल. लक्षात ठेवा की गूळ घालल्यानंतर, बराच वेळ उकळत ठेवल्यास चहा फुटू शकतो, म्हणून चहा कमी उकळवा.

गुळाच्या चहाचे फायदे –  पोट कमी होणे- साखर खाण्याची सवय असलेल्या लोकांनी हिवाळ्यात गूळाचा चहा प्यावा. हे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते आणि व्यक्तीस निरोगी ठेवते. ज्यांना गोड पदार्थ खायला आवडतात अशांनी साखरे ऐवजी गुळ वापरावा.

पचनसंस्था निरोगी राहते – गुळाचा चहा प्यायल्याने पाचक प्रणाली सुधारते आणि छातीत जळजळ होत नाही. गूळामध्ये कृत्रिम गोड पदार्थ कमी असतात. साखरेच्या तुलनेत यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जे आरोग्यस आवश्यक असतात. त्यामुळे गूळाचा चहा हिवाळ्यात फायदेशीर असतो.

मायग्रेनपासुन आराम मिळतो – जर कोणाला मायग्रेन किंवा डोकेदुखी असेल तर अशा व्यक्तींनी गाईच्या दुधात गुळाचा चहा बनवून प्यावा. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो.

लाल र*क्त पेशीत वाढ – अशक्तपणा असल्यास, गूळ खाणे किंवा गुळाचा चहा पिणे फायदेशीर असते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते आणि शरीराच्या विविध भागात ऑक्सिजन पोहोचविण्यासाठी शरीराला लोहाची आवश्यकता असते.

गुळाचे अतिसेवन केल्यास नुकसान सुद्धा होऊ शकते – जास्त गूळ सेवन करणे देखील हानिकारक आहे. गुळाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. यामुळे केवळ वजनच वाढत नाही तर नाकातून रक्तस्त्राव देखील होतो. याशिवाय काही प्रमाणात पाचन तंत्रावरही परिणाम होऊ शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *