पोस्टाच्या अनेक योजना लोकांच्या अत्यंत उपयोगी पडतात. फार कमी किमतीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या अशा या योजना असतात. आपण पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेद्वारे दरमहा पैसे कमवू शकतो. मोठ्या प्रमाणात जोखीम न उचलता आपण पोस्टाच्या योजनांचा लाभ घेऊ शकतो. पोस्टाच्या नवीन योजनेमध्ये आपण संयुक्त खाते म्हणजेच जॉईंट अकाउंट उघडू शकतो आणि आपण आपल्या योजनेचा फायदा उचलू शकतो. चला तर सविस्तर पाहूया पोस्टाच्या नव्या योजनेबाबत !

मासिक बचत योजना – मासिक बचत योजना ही केंद्रीय संचार मंत्रालयातर्फे चालवली जाणारी योजना आहे. मासिक बचत योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे अकाऊंट उघडता येते. अकाउंट उघडताना या योजनेमध्ये आपण कमीतकमी १००० रुपये व जास्तीत ४.५ लाख रुपये गुंतवू शकता. परंतु, जॉईंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त ९ लाख रुपया पर्यत रक्कम आपण जमा करू शकतो. या रकमेवर तुम्हाला ७.६ % ने प्रत्येक महिन्याला व्याज भेटेल.

मुख्यत्त्वे हि योजना रिटायर्ड आणि वरिष्ठ लोकांसाठी अधिक उपयोगी ठरू शकते. दोन किंवा तीन जण एकत्र मिळून देखील जॉईंट अकाउंट उघडू शकतात. या खात्याच्या बदल्यात मिळणारे उत्पन्न प्रत्येक सदस्यास समान दिले जाते. जॉईंट अकाउंट कधीही सिंगल अकाउंटमध्ये रूपांतरित करता येते. सिंगल अकाउंट जॉईंट अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. खात्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांचा संयुक्त अर्ज द्यावा लागतो.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडावे लागेल. यानंतर, जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन आपण एमआयएस फॉर्म घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला आयडी प्रूफ, निवासी पुरावे व २ पासपोर्ट साईज फोटो स्थापित करावी लागतील. ते योग्यरित्या भरून साक्षीदार किंवा नॉमिनीच्या सहीने पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा.

फॉर्मसह खाते उघडण्यासाठी रोकड जमा करा किंवा निश्चित रकमेची तपासणी करा. काही कपातीसह पैसे एका वर्षा नंतर पण रक्कम मिळण्याच्या वेळेपूर्वी काढता येऊ शकतात. एक वर्षानंतर आणि तीन वर्षांपूर्वी पैसे काढताना २ टक्के कपात केली जाते. त्याचबरोबर ३ वर्षानंतर खात्यात जमा झालेल्या रकमेच्या १ टक्के कपात केली जाते. त्याच वेळी, 5 वर्षांनंतर कोणतीही कपात केली जात नाही आणि आपले संपूर्ण पैसे सुरक्षितपणे आपल्याला मिळतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *