शरीर तंदुरुस्त असेल तर आपण भरपूर आयुष्य जगतो. शिवाय आजारपणात भरपूर पैसा खर्च करावा लागत नाही. यामुळे शरीराचे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या अनेकांमध्ये कोलेस्ट्रॉल ही समस्या प्रामुख्याने आढळते. त्यामुळे अशा रुग्णांनी त्यांचे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
तुम्हाला जर तुमचे कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर वनस्पती तूप कधीही वापरू नका. वनस्पती तुपामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक असतो. वनस्पती तूप बाजारात वेगवेगळ्या नावांनी विकला जातो. साधारणतः त्याला डालडा असे म्हणतात. त्यामुळे शक्यतो डालडा खाणे वर्ज करा.
शरीरातील कोलेस्ट्रॉल हे साधारणतः दोन गोष्टींमुळे जास्त वाढते. एक म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे वनस्पती तूप आणि दुसरे म्हणजे मांस. मग ते मास कोंबडीचे असो किंवा बकऱ्याचे किंवा अजून कोणाचे. कोणत्याही प्राण्याचे मांस खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते. याशिवाय बाजारात मिळणारे रिफाइंड ऑइल, डबल रिफाइंड किंवा ट्रिपल रिफाइंड ऑइल शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवते. त्यामुळे कोणताही नावाचे रिफाइंड ऑइल असेल तर ते खाऊ नका.
तुमच्या मनात कधी हा विचार नाही आला का की, जे रिफाइंड ऑइल तुम्ही तुमच्या मुलांना व कुटुंबाला मालीश करायला देत नाहीत, जे केसांना लावू शकत नाही असे रिफाइंड ऑइल तुम्ही खाऊ कसे शकता? पूर्वी रिफाइंड ऑइल हा प्रकार बाजारात नव्हता. तो हल्ली आला आहे.
तेल, तूप हे जितके शरीराला आवश्यक असते तितकेच ते हानीकारक सुद्धा असते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढेच तेल आणि तुपाचे सेवन करावे. जर तेल आणि तूप तुमच्या शरीरात नसेल तर तुम्हाला धड चालता येणार नाही. तुम्ही संध्याकाळचे किंवा सकाळचे फिरायला जात असाल. किती किलोमीटर चालल्यावर देखील तुमचे गुडघे दुखत नाही. हे सर्व तेल आणि तुपाचे परिणाम आहेत. तेल आणि तुपाचे सेवन करताना ते चांगले तर आहे ना या गोष्टी लक्षात घ्याव्यात.
वैज्ञानिक भाषेत बोलायचे झाल्यास आपल्या शरीराला हाय डेंसिटी लिपो-प्रोटीनची आवश्यकता असते. त्यालाच एचडीएल सुद्धा म्हणतात. मात्र आपल्या शरीराला एलडीएल आणि व्हीएलडीएल म्हणजेच खुप लो डेंसिटी लिपो-प्रोटीनची गरज भासत नाही. हे दोन्ही प्रोटीन फैटचे एक सोर्स आहे.
एचडीएल वीना आपले शरीर चालु शकत नाही. आणि या सर्व गोष्टी सरळ घाण्यातुन आलेल्या तेलातुन मिळतात. आता तुम्ही म्हणाल की या तेलाला खुप घाण वास येतो. त्याचा रंगसु्द्धा दिसायला फारसा ठिक नसतो. मात्र त्याच उग्र वासात आणि रंगात प्रोटीन असते. या दोन्ही गोष्टी मधुन एचडीएल मिळते जे शरीरासाठी आवश्यक असते.
डालडा, पामोलिन, रिफाइंड, डबल रिफाइंड तेलापासून तयार केलेले अन्नपदार्थ खाऊ नये. त्याऐवजी सूर्यफूलचे तेल , तिळाचे तेल किंवा राइच्या तेलात तयार केलेले अन्नपदार्थ खा. काही जणांचे म्हणणे असते की तेलतूपामुळे कोलेस्ट्रोल वाढते. पण देशी गायीच्या दुधापासून तयार केलेल्या तुपामुळे कॉलेस्ट्रॉल वाढत नाही. त्यामुळे नियमित व्यायाम करा, रिफाईंड तेलातले पदार्थ खाणे टाळणे, नियंत्रित आहार अश्या गोष्टी करून तुम्ही तुमचे नको असलेले कोलेस्टेरॉल काही महिन्यातच कमी करू शकता.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.