प्रत्येक महिलेला वाटतं की आपण सुंदर दिसावं. प्रत्येकीला काही मेकअप करता येतोच असं नाही, त्यामुळे आपण नैसर्गिकरित्या आणि मेकअप शिवाय सुंदर दिसावं. त्याकरिता बऱ्याच जणी युटूबवर किंवा गुगल वर काही व्हिडीओ पाहतात किंवा माहिती वाचतात आणि त्या गोष्टी घरच्या घरी करून पाहतात. पण तेवढ्यापुरता त्या गोष्टींचा ग्लो राहतो व नंतर पुन्हा ‘जैसे थे’ अशी गत होते किंवा काही वेळेस कोणाच्या त्वचेला तो उपाय सूट झाला तर ग्लो कायम राहतो. प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी आपण काही सोप्या टिप्स पाहूया !
पील ऑफ मास्क वापरा – आपल्या चेहऱ्यावर अनेकदा ब्लॅकहेड्स होतात, तेव्हा आपल्या चेहयावरील क्लॉग्ड पोर्समुले आपली त्वचा स्मूथ नाही दिसत. त्यामुळे पोर स्ट्रिप्स किंवा पील ऑफ मास्क वापरून आपण आपला चेहरा सुंदर ठेवू शकतो.
बर्फाने चेहऱ्यावर मसाज – चेहऱ्यावर बर्फाने मालिश केल्याने चेहऱ्यावर तेज येते. चेहऱ्यावरची सूज आणि पफिनेस यामुळे दूर होतो. सोबतच चेहऱ्याची जळजळ, रॅशेज कमी होण्यास मदत होते.
मॉइश्चरायझर वापरावे – थकवा किंवा तणावामुळे सर्वात आधी परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होतो. त्यामुळे डोळ्यांसाठी अंडर आई एरिया क्रीम आणि डोळ्यांसाठी एक चांगल हायड्रेटिंग आय मास्कचा वापर करावा. त्वचेचा निस्तेजपणा दूर करण्यासाठी मॉइश्चरायझर वापरावे. जेणेकरून त्वचेला पोषण मिळेल आणि ती मऊ, चमकदार दिसेल.
फेस ऑइल देखील आवश्यक – त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी फेस ऑइलचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील डाग, कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतात. नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑइलचे हातावर काही थेंब घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मालिश करावे. रात्रभर तसेच राहू देऊन सकाळी उठून सौम्य फेस वॉशने चेहरा धुवावा. यामुळे र*क्ताभिसरण देखील योग्य प्रकारे होते.
याशिवाय जे ब्युटी ऑइल असतात त्यामध्ये फॅटी ऍसिड्स असतात जे त्वचेचा कोरडेपणा आत मध्येच लॉक करतात. आपला चेहरा धुतल्यावर लगेच चेहऱ्यावर ब्युटी ऑइल लावावे. हलक्या ओल्या त्वचेवर तेल लावल्याने, चेहऱ्यावरील त्वचा आतमधून नरम राहते त्यामुळे चेहरा अधिक ताजा आणि सुंदर दिसतो.
इअररिंग्स – इअररिंग्स आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात. वेगवेगळ्या कपड्यांवर वेगवेगळे एअररिंग्स घातल्याने आपण अधिक सुंदर दिसतो. हे छोटेसे इअररिंग्स आपल्या चेहरा अधिक सुंदर बनवू शकतात. सिंपल लूप, छोटे पर्ल किंवा डायमंड स्टड्स अथवा सिल्वर टॉप्स असे विविध प्रकारचे इअररिंग्स अधिक शाइन आणि स्पार्कल आपल्या लूकमध्ये आणू शकतात.
व्यायाम आणि योगा – खुल्या हवेत व्यायाम व योगा केल्याने शरीरातील र*क्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते. ऑक्सिजनचे योग्य प्रमाण त्वचेवरील चमक दीर्घकाळ ठेवण्यास मदत करते. सोबत व्यायाम व योगा केल्याने फ्रेश वाटते. त्यामुळे डोळ्याखाली सुरकुत्या येत नाहीत, चेहऱ्यावर पफीन्स येत नाही व चेहरा नैसर्गिकरित्या ताजातवाना राहतो.
पापण्यांना मस्कारा लावणे – जेव्हा आपण साधा मेकअप केलेला असताना फक्त डोळ्यांना मस्कारा जरी लावला तरी चेहऱ्यावर एक वेगळा लूक येतो. कारण मस्कारा लावल्याने आपल्या डोळ्यांच्या पापण्या वरच्या बाजूला होतात व आपले डोळे सुंदर व अगदी स्पष्ट दिसतात. यामुळे डोळ्यांना डेफिनेशन देखील मिळते.
पुरेशी झोप – झोप पूर्ण झालेली असली की आपल्याला अधिक ताजेतवाने वाटते. पूर्ण झोपेमुळे मूड सुधारण्यास मदत होते. त्यामुळे दररोज ७-८ तास झोप घेणे हे महत्वाचे आहे. रात्री आपली त्वचा आतून स्वच्छ होण्यास सुरुवात होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !