मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं होतं, दीपिकाच्या धक्कादायक खुलास्याने खळबळ !

86

सध्या बॉलिवूडची टॉप ची अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण या नावाचा बोलबाला आहे. दीपिकाला चित्रपटात घेण्यासाठी निर्माता दिग्दर्शकांचा रांगा लागलेल्या असतात. तिचे चाहते देखील भारता सकट इतर देशभरात सुद्धा आहेत. त्यामुळे तिच्याकडे चित्रपटांसोबतच जाहिरातींच्या देखील रांगा लागलेल्या असतात. दरम्यान एका मासिकाच्या इंटरव्यू मध्ये दीपिकाने एका चकित करायला लावणाऱ्या गोष्टीचा खुलासा केला. या इंटरव्ह्यूमध्ये तिने या इंडस्ट्रीत पदार्पण कसे केले, इंडस्ट्री देण्यासाठी तिला कोणी कसे सल्ले दिले याबाबत माहिती दिली.

दीपिकाने सांगितले की तिला इंडस्ट्रीमध्ये टिकण्यासाठी व चित्रपटांच्या ऑफर्स येण्यासाठी तसेच निर्मात्यांसमोर अधिक ॲट्रॅक्टिव्ह दिसावी यासाठी ब्रेस्ट सर्जरी म्हणजेच मला छातीचा आकार वाढवण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र असे सल्ले देणार्‍यांना दीपिकाने सांगितले की मी तशी मुलगी नाही. मी नेहमीच माझ्या मनाचे ऐकले आणि मनात येईल त्यालाच फॉलो केले.

दिपिकाने पुढे सांगितले की, ती एके काळी ॲथलिट होती. त्यामुळे मला कधी वाटलेच नव्हते तथा कधी याबद्दल विचारच केला नव्हता की मी एक मॉडेल बनेन आणि त्यानंतर एक अभिनेत्री होईन. मात्र मला काय करायचे आहे हे मला सुरुवातीपासून माहित होते. मी माझ्या आयुष्या बाबतीतील निर्णय वयाच्या सतरा अठराव्या वर्षीच घेतले होते.

त्या काळात काही लोक आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात आणि स्वतःच्या घरापासून दूर राहतात. या सर्व गोष्टी मी ही केल्या. पदार्पणात बाबत दीपिकाने सांगितले कि तिचे पदार्पण हे एक ड्रीम डेब्यू होते कारण त्यामध्ये खूप चांगली कास्ट होती, उत्तम म्युझिक होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात शाहरुख खान होता.

मध्यंतरी दीपिका डिप्रेशनची शिकार झाली होती याबाबत तिने सांगितले की तिला वेळीच डिप्रेशन बद्दल समजले. त्यावेळी तिची डिप्रेशनची पहिलीच स्टेज होती त्यामुळे ती त्यातून सहिसलामत बाहेर पडू शकली. नाहीतर ती सुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊन मृत्यूला कवटाळू शकली असती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !