अन्नपदार्थ ताजे रहावे किंवा सुरक्षित रहावे यासाठी आपण ते वर्तमानपत्रात वगैरे लपेटुन नेतो. ऑफिसला जो लंच घेऊन जातात ते सुद्धा काहीजण वर्तमानपत्रात लपेटतात. या व्यतिरिक्त ट्रेन मध्ये किंवा अन्य ठिकाणी प्रवास करते वेळी सुद्धा खायचे पदार्थ वर्तमानपत्रावर ठेवुन खाल्ले जातात. पण असे करणे तुमच्या शरीरास हानिकारक ठरु शकते.
फुटपाथवर विकले जाणारे पदार्थ सुद्धा वर्तमानपत्रात लपेटुन दिले जातात. जे आपल्या स्वास्थ्यास हानिकारक आहे. चॅट, भजी, वडे यांसारखे पदार्थ विशेषता वर्तमानपत्रात ठेवुन खाल्ले जातात. तुम्ही पण जर अशाप्रकारे खाद्यपदार्थ खात असाल तर तुम्हाला सुद्धा भयंकर आजार होऊ शकतात.
कधीच वर्तमानपत्रात लपेटलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत. खास करुन जे गरम असतात असे पदार्थ वर्तमानपत्रात ठेवुन खाल्ल्यास अनेक आजारांना आमंत्रण मिळते. वर्तमानपत्र तयार करण्यासाठी वापरली जाणारी शाईत रासायनिक केमिकल असतात. जे आरोग्यासाठी खुपच हानिकारक असतात. गरम गरम खाद्य पदार्थ जर वर्तमानपत्रात ठेवल्यास त्या वृत्तपत्राची शाई त्या पदार्थाला लागते. जे पदार्थ खाल्ल्यावर आपल्या आरोग्यास धोका निर्माण होतो.
शाईत असलेले केमिकल विषारी असु शकते त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. याव्यतिरिक्त पोटात इंफेक्शन होतेच. वृत्तपत्राच्या शाईमुळे तोंडाचा किंवा पोटाचा कॅंसर होण्याची शक्यता असते.
फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) वृत्तपत्रात लपेटलेले अन्नपदार्थ हानिकारक असल्याचे सांगितले आहे. यामध्ये ही लहान मुलं, वृद्ध व्यक्ती किंवा कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती यांना तर वृत्तपत्रात लपेटलेले अन्नपदार्थ मुळीच देऊ नये. यामुळे फुप्फुस आणि लीवरवर परिणाम होतो. तुम्हाला जर अन्नपदार्थ सुरक्षित ठेवायचे असतील तर ते पदार्थ वृत्तपत्रात लपेटण्या ऐवजी ऍल्युमिनियम फॉयल चा वापर करावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.