बॉलिवुड इंडस्ट्रिमध्ये ज्या लग्नाची सगळे डोळ्यात तेल घालुन वाट पाहत होते. ते अभिनेता वरुण धवन आणि त्याची लॉंग टर्म गर्लफ्रेंड नताशा दलालचे लग्न रविवार 24 जानेवारी 2021 ला पार पाडले. हे लग्न अलिबाग येथील एका हॉटेल मध्ये अगदीच वैयक्तिकरित्या पार पाडले. या लग्नाला मोजक्याच मंडळींना आमंत्रण होते.

बॉलिवुडचा सध्याचा चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता वरुण धवन सोबत लग्न करायचे अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या अनेक मुलींचे मन मोडले जेव्हा वरुणचे नताशा दलाल सोबत असलेले अफेअर बाहेर आले होते. वरुण आणि नताशाला अनेकदा वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले. बॉलिवुडमध्ये कोणतेही इव्हेंट फक्शन असो वरुण त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन तिथे पोहचायचा. त्यामुळे हि नताशा नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तर मंडळी नताशा दलाल ही वरुण धवनची बालमैत्रिण आहे. तिचा जन्म मुंबईत १६ मार्च १९८९ ला झाला. तिने न्यु यॉर्क येथील फॅशन इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी मधुन फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले. २०१३ ला ती शिक्षण घेऊन ती भारतात परतली. त्यानंतर तिने स्वत:चे असे नताशा दलाल लॅबल या नावाचे डिझाइन हाऊस लॉन्च केले.

या हाऊसमध्ये ब्राइडल ड्रेसेस, लेहेंगाज्, गाऊन, सेमी फॉर्मल ड्रेसेस, फॉर्मल ड्रेसेस यांसारखे कपडे नताशा स्वत: डिझाइन करते. आतापर्यंत तिने अनेक बॉलिवुड आणि टेलिव्हिजिन कलाकारांसाठी कपडे डिझाइन केले आहेत. तिच्या बद्दल विशेष सांगायचे झाल्यास २०१९ मध्ये मिस वर्ल्ड ठरलेली भारताची मानुषी चिल्लरने तिच्या मिस वर्ल्डच्या शेवटच्या राउंडाला जो ड्रेस परिधान केलेला तो नताशानेच डिझाइन केलेला.

याबाबत तिने तिच्या फॅशन हाउसच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरुन माहिती दिली होती. नताशाचे स्वत:चे इंस्टाग्राम अकाउंट जरी तिने प्रायव्हेट ठेवले असले तरी ती तिच्या बिझनेस अकाउंटवरुन ती तिच्या कामाबद्दल फोटो अपडेट करत असते. इंडस्ट्रीमधील यशस्वी फॅशन डिझायनर होण्याचे नताशा चे स्वप्न आहे.

नताशा दलाल आणि वरूण धवन यांचे लग्न जरी अलिबाग मध्ये खूपच प्रायव्हेटली झाले असले तरीही येत्या दोन फेब्रुवारीला मुंबईत इंडस्ट्रीमधील कलाकारांसाठी ग्रँड रिसेप्शन ठेवणार असल्याचे माहिती मिळाली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *