हिंदीमधील सर्वात लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम (रियॅलिटी शो) म्हणजे “द कपिल शर्मा शो” नेहमीच चर्चेत असतो. कलर्स हिंदी वर हा शो सुरु असतो. बॉलीवूडमधील अनेक कलाकार हे या शोमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येतं असतात. सोबतच कलाकारांचे चित्रपट निर्मिती करताना घडलेले किस्से, मजा मस्ती चर्चांमधून समोर येते. या शो चा प्रत्येक एपिसोड हा खूप मनोरंजक असतो. दिवसभरातील कामाचा ताण विसरून लोक हा शो पाहून दिलखुलास हसतात. पण हल्ली हा शो बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीने लोकांमध्ये नक्कीच निराशा पसरली आहे. काही ठराविक कालावधीपुरता हा शो बंद करण्यात येणार असून नंतर एका नव्या अंदाजात हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, हेच हा शो बंद होण्यामागचे कारण आहे. कपिल शर्मा शो चा नवा अंदाज काय असेल हे पाहण्यासाठी देखील प्रेक्षक तितकेचं उत्सुक असतील. कपिल शर्मा शो नेमका कधी बंद होऊन नंतर पुन्हा नव्या अंदाजात कधी सुरु होईल, याबद्दल अधिक माहिती प्राप्त झालेली नाही.

ज्याप्रमाणे कलाकारांचे काही किस्से या शोमध्ये उलगडतात. त्याचप्रमाणे खुद्द कपिल शर्माने त्याच्या लग्नामधील एक किस्सा सांगितला. कपिल शर्मा आपल्या लग्नाच्या मंडपातून पळून गेले होते आणि स्वतःला एका खोलीमध्ये काही काळासाठी बंद केले होते. १२ डिसेंबर २०१८ मध्ये कपिल शर्माने गिन्नी चतरथ सोबत विवाह केला. लग्नापूर्वी अनेक काळापासून ते दोघे एकमेकांना ओळखतात.

गिन्नीसाठी लग्नाची मागणी घालायला कपिलने त्याच्या आईला गिन्नीच्या घरी पाठवले होते परंतु गिन्नीच्या वडिलांनी या नात्याला नकार दिला. पण काही प्रयत्नानंतर तिच्या वडिलांनी या नात्याला मंजुरी दिली. लग्नाच्या एका वर्षानंतर कपिल आणि गिन्नीला कन्यारत्न झाले. गिन्नीने १० डिसेंबर २०१९ मध्ये मुलीला जन्म दिला, तिचे नाव अनायरा असे ठेवले. कपिल शर्मा आपल्या मुलीचे छान फोटो व व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत असतात.

कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा शो’ सुरु करण्याआधी बॉलीवूडमध्ये त्याने अभिनेता म्हणून देखील काम केले आहे. २०१५ साली रिलीज झालेल्या ‘किस किस को प्यार करू’ या बॉलीवूड चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ‘फिरंगी’ नावाच्या चित्रपटात देखील कपिलने काम केले. या दोन्ही चित्रपटांना चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद दिला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा लवकरच वेब सिरीजमध्ये आपल्याला दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *