बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्रींचा बोलबोला आहे. मात्र त्यातल्या निवडक अभिनेत्री या प्रेक्षकांच्या मनात घर करण्यास यशस्वी होतात. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे दिशा पठाणी. सध्याची बॉलिवुडची सर्वात हॉट अभिनेत्री म्हणुन दिशा प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर सुद्धा दिशा तिचे सुंदर लुक्सचे आणि फॅशनेबल कपड्यांचे फोटो टाकत असते. तिच्या सौंदर्यामुळे तिने तिच्या चाहत्यांची मने जिंकुन घेतली आहे.

त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र ड्रेसिंग स्टाइल एक्सपर्टच्यामते दिशाला तिच्या ड्रेसिंग सेन्सवर अजुन मेहनत करणे गरजेचे आहे. जीन्स, फ्लोरल मिनिस, स्लोगन टीज, डेनिम शॉर्ट्स, एथलेबिकिंग यांसारख्या गोष्टी दिशाच्या वार्डरोबमध्ये खुप आहेत पण तरीही तिचे कपडे तिच्या चाहत्यांना आवडत नाही.

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी दिशाचे कपडे अभिनेता टायगर श्रॉफ सांभाळताना दिसला आहे. ऑफ ड्युटी दिशा जरी कोणतेही कपडे घालत असली तरी मोठ्या पडद्यावर मात्र ती तिच्या ड्रेसिंगवर विशेष लक्ष देते. पार्टी, इव्हेंट, अवॉर्ड फंक्शन यांसारख्या ठिकाणी दिशा खुप सुंदर कपडे परिधान करत असते. मात्र यामध्येसुद्धा काही वेळेस तिचा गोंधळ होतोच.

२०१८ ला जेव्हा दिपिका आणि रणवीर सिंहचे लग्न झाले होते. त्यावेळी त्यांनी समस्त बि-टाऊनसाठी मुंबईत शानदार रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला दिपिका आणि रणवीरच्या परिवाराव्यतिरिक्त बॉलिवुड कलाकारही उपस्थित होते. या पार्टीत दिशा आणि टायगर जोड्याने पोहचले होते. हे दोघे पार्टीला जाताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा या दोघांवर खिळल्या. मात्र त्या रिसेप्शनमधला रेड कार्पेटमधला एक फोटो खुप व्हायरल झाला. ज्यात टायगर दिशाचा ड्रेस सांभाळताना दिसला.

या पार्टीत दिशाने MAISONYEYA ने डिझाइन केलेला प्लंगिंग नेकलाइन वाला ग्रे मेटेलिक लॉन्ग गाउन परिधान केला होता. तर टायगरने काळ्या रंगाची पॅंट आणि सफेद कोट घातला होता. दिपिका रणवीरच्या रिसेप्शनमधला दिशाचा ओवर ऑल लुक सटल मेकअप, गळ्यात चोकर नेकलेस, स्मोकी आईज आणि मोकळे केस असा होता. सोबतच दिशाने ALDO चा स्टाइलटोस सुद्धा घातला होता.

दिशा आणि टायगरने कधीच त्यांच्या नात्या बद्दल सार्वजनिक रित्या जाहिर केलेले नाही. मात्र कोणापासुन लपवले सुद्धा नाही. दोघे अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे दिसुन येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *