बॉलिवुडची चुलबुली अभिनेत्री काजोल गेली कित्येक वर्षे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. काजोलने आतापर्यंत अनेक एकाहुन एक सरस पात्र साकारली आहे. आजपर्यंत तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. काही दिवसांपुर्वीच रिलीज झालेल्या ‘त्रिभंगा’ मधील अभिनयसुद्धा प्रेक्षकांना खुप आवडला. एवढे दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करुन सुद्धा तिने कधीच गोविंदासोबत काम केले नाही. याबाबत तिने एका इंटरव्ह्युमध्ये खुलासा केला.

गोविंदा ९० च्या दशकातील सुपरस्टार होता. आजसुद्धा त्याची फॅन फॉलोइंग कमी झालेली नाही. त्याकाळात त्याने अनेक मोठ्या अभिनेत्रींसोबत काम केले. मात्र तो कधीच काजोल सोबत मोठ्या पडद्यावर कधीच दिसला नाही. याबाबत काजोलने सांगितले कि, ते दोघे जंगली नावाचा चित्रपट करतपण होते. तो चित्रपट राहुल रवैल दिग्दर्शित करणार होते.

त्या चित्रपटाचे फोटोशुटपण झालं होत. पण तो चित्रपट चालु होण्या आधीच बंद झाला. काजोलने सांगितले कि त्या फोटोशुट व्यतिरिक्त आमचे कोणतेच शुटींग झाले नव्हते. मात्र गोविंदा अभिनेता म्हणुन खुप कमाल आहे. कारण लोकांना हसवणे खुप कठीण काम आहे जे गोविंदा खुप बखुबीने निभावतो.

त्यानंतर जेव्हा काजोल ला जेव्हा विचारले कि ती भविष्यात गोविंदा सोबत काम करु इच्छिते का ? त्यावर काजोलने सांगितले कि भविष्यातले माहित नाही पण तो एक कमाल अभिनेता आहे. जर कोणते चांगले काम मिळाले तर आम्ही नक्कीच काम करु. त्याकाळी काजोलची जोडी शाहरुख खान, सलमान खान आणि अजयसोबत खुप गाजली. आजसुद्धा शाहरुख आणि काजोलची जोडी पडद्यावर पाहायला खुप आवडते.

तर दुसरीकडे गोविंदाची जोडी करिश्मा कपूर आणि रवीना टंडन सोबत खुप गाजली. या दोन्ही अभिनेत्रींचे चित्रपट गोविंदासोबतच खुप गाजले. सध्या गोविंदा चित्रपटात खुप कमी दिसतो. मात्र काजोल आजसुद्धा चित्रपटात अॅक्टिव्ह आहे.
तिचे ‘त्रिभंगा’ आणि ‘तान्हाजी’ हे दोन्ही चित्रपट लोकांना खूप आवडले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *