मुकेश अंबानी हे जगातील चौथे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची लाइफस्टाइल लोकांना खुप आकर्षित करत असते. त्यांची पत्नी नीता अंबानी या रिलायन्स इंडस्ट्रीच्या मालक आहेत. त्यासुद्धा त्यांच्या उच्च राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे शौक खुप महागडे असुन त्याबद्दल सर्वसामान्य लोक साधा विचारपण करु शकत नाही. इंटरनेटवर त्यांच्या महागड्या शौकबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांच्या ८ महागडे शौक सांगणार आहोत.

एक चहाची किंमत आहे लाखो रुपये – सर्वसामान्य माणसांच्या एक कप चहाची किंमत साधारण १० ते १५ रुपये इतकी असते. मात्र निता अंबानी यांच्या चहाची किंमत ऐकुन तुम्ही नक्की ह*ड*ब*डु*न जाल. एका मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की त्या जपानच्या सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रॅंण्ड नोरिटेकच्या कपमधुन चहा पितात. नोरिटेक क्रॉकरी ५० पीसच्या सेटमध्ये येतो. या कपची विशेष गोष्ट म्हणजे त्याला सोन्याची बोर्डर असते ती जी कमीतकमी दिड करोड रुपयांला असते. याचाच अर्थ एका कपाची किंमत साधारण ३ लाख रुपये असते. त्यामुळे नीता अंबानी रोज ३ लाख रुपयांचा चहा पितात असे म्हटल्यास हरकत नाही.

महागड्या हॅण्डबॅगेसची आहे आवड – नीता अंबानी यांना स्टाइलिश हॅण्डबॅग वापरण्याचा खुप शौक आहे. त्यांच्या काही बॅग तर हिरेजडीत असतात. चनेल, गोयार्ड आणि जिम्मी चू केरी यांसारख्या बॅगांचे कलेक्शन नीता अंबानी यांच्या कडे आहे. त्या अनेकदा ज्यूडिथ लाइबरच्या गैनिश क्लच वापरताना दिसल्या आहेत. तो कल्च आकाराने जरी छोटा असला तरी तो हिरेजडित असल्यामुळे त्याची सुरुवातीची किंमतच ३-४ लाख रुपये आहे.

एकदा वापरलेली चप्पल पुन्हा वापरत नाही – नीता अंबानी यांना बॅग्ज सोबतच चपलांचासुद्धा शौक आहे. त्यांच्याकडे पेड्रो, गार्सिया, जिम्मू चू, पलमोड़ा, मार्लिन ब्रांडचे शुज आणि सॅण्डल आहेत. या सर्व ब्रॅण्डची सुरुवातीची किंमत लाखो रुपये आहे. नीता अंबानींबद्दल बोलले जाते कि त्या एकदा वापरलेली चप्पल पुन्हा वापरत नाही.

घड्याळची किंमत ऐकुन व्हाल चकित – नीता अंबानी या त्याच्या स्टेअसप्रमाणे उंचे शौक ठेवतात. त्यामुळे घड्याळ सुद्धा त्या साधेसुधे घालत नाही. बुल्गारी, कार्टियर, राडो, गुची, केल्विन केलिन आणि फॉसिल यांसारख्या ब्रैंडचे घड्याळ वापरणे त्या पसंत करतात. या घड्याळ्याची किंमत दिड ते दोन लाखांपासुन सुरु होते.

साडी आणि दागिने – साडी आणि दागिने हा समस्त स्त्रि वर्गाचा वीक पॉइंट आहे. त्यामुळे त्यांना कधीही त्यांना साड्या किंवा दागिन्यांची खरेदी करायला खुप आवडते. यामध्ये नीता अंबानीसुद्धा मागे नाही. त्या वेगवेगळ्या फंक्शन मध्ये सुंदर साड्या आणि दागिने परिधान करुन येतात. त्या साड्या आणि दागिन्यांची किंमत करोडोंच्या घरात असते. त्यांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याला जी साडी नेसली होती त्या साडीची किंमत ४० लाख रुपये असल्याचे म्हटले जाते.

लाखो रुपयांच्या असतात लिपस्टिक – मेकअप करुन सजाधजायला सर्व महिलांना आवडते. सर्व सामान्य स्त्रिया साधारण १०० ते ५०० रुपयांपर्यंत लिपस्टिक वापरतात. मात्र नीता अंबानी या कस्टमाइज्ड लिप्सटिक वापरतात. त्यांच्याकडे साधारण ४० लाख रुपयांच्या लिपस्टिकचे कलेक्शन आहे. एवढा महागडा मेकअप सर्वसाधारण महिला या केवळ स्वप्नातचे करु शकतात.

प्राइव्हेट जेटच्या आहेत मालक – नीता अंबानी यांच्याकडे त्यांचे खासगी जेट आहे. या जेटची किंमत साधारण १०० करोड पर्यंत आहे. तो जेट त्यांना २००७ मध्ये त्यांचे पती मुकेश अंबानी यांनी गिफ्ट केला होता. या जेटच्या आत फाइव्ह स्टार हॉटेल सारख्या सुविधा आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *