एखाद्या मुलीला समजुन घेणे किंवा तिच्या मनात काय चालु आहे हे समजुन घेणे फार कठीण असते. आजपर्यंत मुलीच्या मनात काय चालले आहे हे कोणीच ओळखु शकलेले नाही. एका मुलीला मुलाकडुन नक्की काय हवे असते हे आजदेखील समजलेले नाही. काहीवेळा तर मुलं मुलींना प्रपोज करावे कि नाही याबाबतीत संभ्रमात पडतात.
मुलींचा स्वभाव खुप विनम्र आणि चांगला असतो. मुली साधारणपणे सर्वांशीच चांगल्या बोलतात. त्यामुळे काहीवेळेस मुलांना त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो कि त्या त्यांना पसंत करत आहेत. त्यामुळे मुलं त्यांना प्रपोजपण करतात पण मुलींच्या मनात तसे काही नसल्यामुळे ते रिजेक्ट करतात. तेव्हा मात्र मुलांना खुप दु:ख होते.
काहीवेळेस मुलाला एखादी मुलगी खुप आवडते पण तिला प्रपोज करण्याची त्याला हिंमत होत नाही. कारण मुलीच्या मनात त्याच्याबद्दल काय भावना आहेत हेच त्याला माहित नसते. आज आम्ही तुम्हाला मुलींच्या काही विशेष इशाऱ्याबद्दल सांगणार आहोत कि ज्यामुळे मुलींच्या मनात काय आहे हे तुम्हाला समजेल.
1) एखादी मुलगी जर तुमची गरजेपेक्षा जास्त काळजी घेत असेल तर समजुन जा कि त्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी आहे. तुम्ही आजारी पडलात किंवा तुमच्यासोबत काही वाईट घडले तर तुमची काळजी घेणारे खुपजण असतात. त्यावेळी त्या मुलीला चुकिचे समजु नका.
जर मुलगी छोट्यामोठ्या गोष्टीत सुद्धा तुमची काळजी घेत असेल तर समजा तिचे तुमच्यावर खुप प्रेम आहे. तुम्ही वेळेत खाल्ले कि नाही , सुखरुप घरी पोहचला कि नाही यांसारख्या गोष्टींची मुलगी जर काळजी घेत असेल तर ती मुलगी नक्कीच तुमच्यावर खुप प्रेम करते.
2) जर एखादी मुलगी तुमच्याकडे टक लावुन बघत असेल किंवा लपुन छपुन तुमच्याकडे पाहत असेल तर समजुन जा कि ती तुम्हाला पसंत करते. यासाठी तुम्हाला मुलीच्या चेहऱ्यावरील हावभाव ओळखावे लागेल. हा पण तुम्ही जर तिच्याकडे रागात पाहात असाल म्हणुन ती तुमच्याकडे पाहत असेल असे व्हायला नको. तुम्ही जर त्या मुलीकडे जास्त लक्ष देत नसाल तरीही ती तुमच्याकडे पाहत असेल तर तुम्ही तिच्याकडे स्वत:हुन मैत्रीचा हात पुढे करा. आणि तुम्ही स्वता तपासा कि ती खरंच तुम्हाला पसंत करते का.
3) एखादी मुलगी तुम्हाला दिवसातुन भरपुर मेसेज करत असेल तर काही वेळेस असेही असु शकते कि ती तुम्हाला लाइक करते. फक्त यासाठी मुलगी काम नसताना सुद्धा तुम्हाला मेसेज करते का ते पहा. जर ती तसे करत असेल तर ती नक्कीच तुमच्या प्रेमात पडली असे समजुन जा.
4) काही कामानिमित्त किंवा काही कारणास्तव तुम्ही कुठे लांब गेला असाल त्यामुळे तुमचे बोलणे फार होत नसेल तर त्यावेळी ती मुलगी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमची तिला किती आठवण येते हे जर सांगत असेल तर समजुन जा कि त्या मुलीला तुम्ही आवडता.
5) जर एखादी मुलगी सारखा सारखा तुमचा हात पकडत असेल किंवा तुमचे गाल खेचत असेल किंवा मजामस्तीत तुमच्या जवळ येत असेल तर समजुन जा ती मुलगी तुम्हाला लाइक करते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !