सात जन्माचे नाते म्हणजे पती पत्नीचे नाते. पती,पत्नी एकमेकांच्या साहाय्याने जीवनातले सर्व निर्णय घेत सुखाने व आनंदाने जीवन व्यतीत करतात, कधी मतभेद होतात, पण एकमेकांना सांभाळून घेत व कुटुंबाच्या साहाय्याने ते सुखाने नांदतात. आजकालच्या या मॉडर्न जगात लग्न टिकणं फार अवघड झालाय. अवघ्या एका जन्माचं नातं जरी टिकलं तरी फार आहे. छोट्या मोठ्या मतभेदांमुळे नात्यांमध्ये दुरावा येतो.
पत्नीची आपल्या पतीकडून काही अपेक्षा असते की, त्याने तिच्यासाठी काही गोष्टी कराव्यात आणि जर पतीला न सांगता त्याने या अपेक्षा पूर्ण केलातर त्या पत्नीहून जगात कोणीच सुखी नाही असे तिला वाटते. तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे आयुष्य अजून खुलत जाते. अशा कोणत्या पत्नीच्या अपेक्षा असतात ज्या तिच्या पतीने पूर्ण कराव्यात अशी तिची इच्छा असते.
कौतुकाचे २ शब्द – पतीने आपल्या सौंदर्याचे कौतुक करावे अशी पत्नीची इच्छा असते. जेव्हा पत्नी छान सजून सवरून पतीसमोर येते तेव्हा त्याने तिच्या सौंदर्याचे कौतुक करावे अशी तिची अपेक्षा असते. पण जर पतीने कौतुक नाही केले तर मात्र ती नाराज होते.
पतीचे सिक्रेट्स – नात्यामध्ये विश्वास हा महत्त्वपूर्ण असतो. पती पत्नी एकमेकांवर विश्वास ठेवत अनेक जबाबदाऱ्या पार पडतात. पत्नी ही जीवनसंगिनी असते, त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडलेली आणि घडणाऱ्या गोष्टी तिला माहित असावं, अशी तिची इच्छा असते. तुमच्या भूतकाळात किंवा बालपणी घडून गेलेल्या गोष्टी तिच्यासोबत शेयर कराव्या. जेव्हा तुमच्या लाईफमधील सर्व सिक्रेट्स, गुपित तिला सांगितल्यास तिला असं वाटतं की तिच्यावर पतीचा पूर्ण विश्वास आहे.
केयरिंग पार्टनर – पत्नी ही घरातील सर्व गोष्टींची घरातल्या सर्वांची काळजी घेते. पतीसोबत इतर घरातील लोकांना कोणाला काय हवं नको ते पाहते, पतीची तब्येत ठीक नसेल तर पत्नी दिवसरात्र त्याची सेवा करते त्याच्याजवळ असते. पण जर हेच कधी पत्नीची तब्येत ठीक नसेल तर पती तिची सेवा करतो का? फार क्वचित अशी उदाहरणं आहेत. प्रत्येक पत्नीला असं वाटतं की आपला पती फार काळजी घेणारा असावा.
रोमँटिक व सुखद क्षण – अनेकदा असं होतं की, पती लग्नानंतर बदलला असे पत्नीला वाटते. लग्नापूर्वी तो जसं पत्नीला खुश ठेवायचा तसं आता काही करताना दिसत नाही अशी पत्नीची तक्रार असते. प्रत्येक पत्नीला असं वाटत कि आपल्या पतीने आपल्यालाला जवळ घ्यावे, आपल्याशी प्रेमाने बोलत बसावे, कधीतरी दोघेच डिनर डेटला जावं, छान रोमँटिक क्षण पतीबरोबर व्यतीत करावे.
वाईट परिस्थितीत पतीची सोबत – पतीच्या वाईट परिस्थितीत तिला सर्वात जास्त गरज पतीच्या सोबतीची असते आणि या सोबतीने तिचा आत्मविश्वास वाढतो. तिच्या पतीची सोबत असेल तिच्याबरोबर तर तो वाईट वेळ निघून जायला तिला सोबत मिळते. त्यामुळे पत्नीच्या दुःखाचे कारण समजून घेऊन पतीने तिला आधार द्यावा सोबत राहावे अशी तिची अपेक्षा असते.
शारीरिक संबंध – पत्नीची स्वतःची काहीतरी शारीरिक गरज असते. त्यामुळे अशा परिस्थितीत पतीने वेळोवेळी पत्नीशी शारीरिक संबंध ठेवले पाहिजेत. यामुळे दोघे एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघांमधील प्रेमही वाढते.
स्पेशल असल्याचे फिलिंग – प्रत्येक मुलीला वाटतं, आपण स्पेशल आहोत त्या व्यक्तीसाठी तर त्याने तसं आपल्याला फील करवून द्यावं. हिच अपेक्षा पत्नी देखील आपल्या पती कडून करतात. आपल्या पतीने आपल्याला कधीतरी सरप्राईझ द्यावे, गिफ्ट द्यावे किंवा स्पेशल डेट प्लॅन करावी अशी तिची इच्छा असते.
स्वातंत्र्य – कोणालाही घरात जेल असल्यासारख्या बंद राहायला आवडत नाही. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करता स्वतःला आनंदी ठेवणं प्रत्येकालाच हवं असतं. पत्नीला देखील कोणत्या बंधनांमध्ये जखडून ठेवलेले तिला आवडत नाही. पतीने आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला कोणत्याही गोष्टी करण्यापासून टोकू नये अशी त्यांची इच्छा असते. सोबतच प्रत्येक गोष्टीत संशय घेणे, पत्नीला बिलकुल आवडत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !