लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. पण हल्ली तर लग्नाआधीच एकमेकांना समजून घेण्यासाठी त्यांच्यासोबत आपण आयुष्यभर राहू शकतो की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी अनेकजण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. लग्नाआधी नवरा-बायको प्रमाणे एकत्र राहण्याला लिव्ह-इन-रिलेशनशिप असे म्हटले जाते.

कायद्याद्वारेच लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. कायद्याद्वारे लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी मुलाचे वय हे २१ वर्षापेक्षा अधिक असावे तर मुलीचे वय हे १८ वर्षापेक्षा अधिक असावे. आजच्या काळात आपल्या जोडीदाराला अधिक चांगले समजून घेण्यासाठी बरेचसे कपल्स लिव्ह इन मध्ये राहतात. बॉलिवूडमधील असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत जे लिव्ह इन मध्ये राहतात. पाहुयात कोण आहेत हे कलाकार !

१. सैफ अली खान व करिना कपूर – २००८ मध्ये टशन चित्रपटाच्या चित्रीकरणापासून सैफ आणि करीनाच्या प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली होती. लग्नाआधी एकमेकांना समजून घेण्यासाठी ते दोघे लिव्ह इन मध्ये राहत होते. २०१२ मध्ये त्या दोघांनी लग्न केले.

करिना सैफसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे करिनाने कधीच मिडियापासून लपवले नाही. आज दोघे ही बॉलिवूडमधील बेस्ट कपलच्या यादीमध्ये येतात. त्यांना तैमूर नावाचा एक मुलगा आहे तर आता करिना आणि सैफ पुन्हा एकदा नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत .

२. विराट कोहली व अनुष्का शर्मा – क्रिकेट आणि बॉलिवूड तसं फार जुनं समीकरण आहे. क्रिकेट जगतातील प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे देखील लग्नाआधी लिव्ह इन मध्ये राहिले आहेत. त्यामुळे हे दोघे नेहमीच चर्चेत होते. ११ डिसेंबर २०१७ मध्ये विराट आणि अनुष्का या दोघांनी इटली येथे लग्न केले होते. ११ जानेवारीला अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका ठेवण्यात आले आहे.

३. आमिर खान व किरण राव – बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता, चित्रपट निर्माता असलेला अमीर खान व त्याची पत्नी किरण राव हे दोघे देखील लग्नापूर्वी लिव्ह इनमध्ये राहत होते. या दोघांनी २००५ साली लग्न केले. किरण राव हि अमीर खानची दुसरी पत्नी आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्त असे आहे. अमीर खानाला १ मुलगी व २ मुलगे आहेत.

४. कुणाल खेमू व सोहा अली खान – बॉलिवूडमधील गोलमाल या चित्रपटाच्या सिक्वेल्समधील एक पात्र रंगवणारा व इतर चित्रपटांमधून आपल्याला दिसलेला कुणाल खेमू आणि सोहा अली खान हे दोघे देखील २०१३ पासून २०१५ मध्ये लग्न होईपर्यंत लिव्ह इन मध्ये राहत होते. सोहा अली खान ही सैफ अली खानची बहीण आहे. कुणाल आणि सोहाने काही चित्रपट एकत्र केल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले व प्रेमात पडले. या दोघांना ही एक मुलगी आहे.

५. कृष्णा अभिषेक व कश्मिरा शाह – विनोदवीर असलेला कृष्णा अभिषेक याने कश्मिरा शाह हिच्यासोबत लग्न करण्याआधी ते दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. त्या दोघांनी २०१३ मध्ये कोणालाही न सांगता गुप्तपणे लग्न केले आणि २०१४ मध्ये त्या दोघांनी लग्न केले असल्याचे जाहीर केले. यामुळे हे दोघे ही चर्चेत होते. या दोघांना ही दोन मुले आहेत.

६. राजकुमार राव व पत्रलेखा – बॉलिवूड मधील टॅलेंटेड व सुप्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव व अभिनेत्री पत्रलेखा हे दोघे ही लिव्ह इन मध्ये राहत असल्याने चर्चेचा विषय ठरतात. आजपर्यंत पत्रलेखा व्यतिरिक्त राजकुमार रावचे नाव इतर कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले गेले नाही आणि राजकुमार राव पत्रलेखाच्या बाबतीत फारच लॉयल असल्याचे दिसतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *