बॉलीवूडमध्ये अनेक यशस्वी अभिनेत्री आहेत. ज्यांनी विवाहानंतर देखील अभिनयक्षेत्रात कमबॅक केले आहे. बॉलीवूडमध्ये पापणी लवताच नाती जुळतात आणि तुटतात. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक काळ व आनंदाने सुखी राहणाऱ्या जोडप्यांपैकी एक म्हणजे अजय देवगण आणि काजोल. त्यांच्या लग्नाला फेब्रुवारीमध्ये २२ वर्ष पूर्ण होणार आहेत.
काजोल ही अगदी बिनधास्त आणि मस्तीच्या मूड मध्ये असते. त्याउलट अजय देवगण नेहमीच अगदी सिरीयस मूडमध्ये असतो. पण म्हणतात ना opposite attracts तसंच आहे हे जणू. तब्बल २० वर्षांनंतर देखील त्यांचं नातं अगदी घट्ट आहे. न्यासा आणि युग नावाची दोन गोड मुलं देखील त्यांना आहेत. पण यांच्या या लग्नाला काजोलच्या बाबांचा नकार होतं असल्याचे काजोलने एका मुलाखतीत सांगितले.
काजोल ही शोमू मुखर्जी व तनुजा मुखर्जी यांची मुलगी आहे. वयाच्या २४ व्या वर्षी काजोलने अजय सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, काजोलचे बाबा या लग्नाच्या विरुद्ध होते. त्यांच म्हणणं होतं की, लग्न करण्याआधी काजोलने अभिनय क्षेत्रात अजून काही दिवस काम करावं आणि मग लग्नाचा निर्णय घ्यावा.
पण काजोलची आई तनुजा यांचा त्यांच्या लग्नाला पाठिंबा होता. तनुजा मुखर्जी काजोलला म्हणाल्या, “तू तुझ्या मनाचं ऐक!” अजय आणि काजोल एकमेकांना खूप जास्त आवडू लागले होते आणि म्हणूनच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काजोलने स्वतःच्या मनाचं ऐकत २४ फेब्रुवारी १९९९ साली अजय सोबत विवाह केला.
काजोल आणि अजय यांचं लग्न झालं तेव्हा ब-याच लोकांचं असं मत होतं की त्यांचं नातं जास्त काळ टिकणार नाही कारण त्यांचे स्वभाव विरुद्ध आहेत. पण आजही त्यांचं नातं नुकतंच उमललेल्या फुलाप्रमाणे आहे.
प्यार तो होना ही था, इश्क, दिल क्या करे, राजू चाचा, यू, मी और हम आणि तान्हाजी या चित्रपटांमध्ये अजय आणि काजोलने एकत्रित काम केलं आहे. ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीनवरील चाहत्यांची ही आवडती जोडी आहे. काजोल आणि अजयचा तान्हाजी ह्या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. काजोलचा ‘त्रिभंग’ नावाचा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !