भारतीय पोशाखात एक वेगळेपणा असतो. स्वत:ची अशी एक विशिष्ठता असते. भारतीय महिलांचा साडी हा विशेष पोशाख असतो. साडी स्त्रियांच्या सौंदर्यात आणखी भर घालते. देशभरात साडी नेसण्याची वेगवेगळी पद्धत आहे. प्रत्येक स्त्रिची साडी नेसण्याची पद्धत तिचा लुक पुर्णपणे बदलुन टाकते. तुम्ही साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसु शकता.

जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न ठरते तेव्हा त्या मुलीला साडी नेसायला शीक असे सतत सुनावले जाते. कारण ज्यांना साडी नेसायला येत नाही त्या मुलींना नंतर खुप त्रास सहन करावा लागतो. परंतु आता लोक या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही कारण बाजारात आता रेडीमेड साड्या सुद्धा विकल्या जाऊ लागल्या आहेत.

पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत जी साडी नेसण्यात माहिर आहे. आता तुम्ही म्हणाल साडी नेसण्यात कोणतं आलं टॅलेंट. पण एक अशी महिला आहे जीने साडी नेसवणे तिचे प्रोफेशन बनवले आहे. एवढे नव्हे तर ही महिला साडी नेसवण्यासाठी हजारो ते लाखो रुपये चार्ज करते. या महिलेने बॉलिवुडच्या अनेक सेलिब्रेटींना साडी नेसवली आहे. चला तर जाणुन घेऊ कोण आहे ती महिला.

या महिलेचे नाव आहे डॉली जैन. ती बॅंगलोरला राहते. तिचा जन्म बॅंग्लोरलाच झाला. ती तेथुनच तिचा साडी नेसवण्याचा बिझनेस करते. डॉलीने आतापर्यंत प्रियंका चोपडा, दिपिका पादुकोण, ईशा अंबानी, नीता अंबानी, आशा भोसले आणि श्रीदेवी यांसारख्या मोठमोठ्या सेलिब्रेटींना साड्या नेसवल्या आहेत. जेव्हा कुठल्याही सेलिब्रेटीकडे कोणते फंक्शन असते तेव्हा त्या डॉलीलाच साडी नेसवण्यासाठी बोलवतात.

एवढेच नाही तर डॉलीचे नाव लिम्का बुक ऑफ़ रिकॉर्डमध्ये सुद्धा नोंदवले आहे. त्यांनी एका साडीला ३२५ वेगवेगळ्या पद्धतीने नेसवले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर १८ सेकंदात साडी नेसवण्याचा रेकॉर्डपण आहे.

डॉलीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की तिला साडी नेसायला मुळीच आवडायचे नाही. मात्र तिचं लग्न ज्या घरात झाले तिथे स्त्रिया फक्त साडीच नेसायच्या. सुरुवातीला डॉलीला या गोष्टीचा त्रास झाला मात्र नंतर तिने ही गोष्ट स्वीकारली. आणि अचानक तिच्या मनात आले की जर साडी नेसायची आहे तर ती वेगळ्या पद्धतीने नेसून बघावी. त्यानंतर डॉलीने इतर महिलांना नोटीस करणे सुरू केले.

आणि नंतर ती स्वतः हा वेगवेगळ्या प्रकारे साडी नेसू लागली व पुढे हळूहळू त्या गोष्टीत माहिर झाली. सुरुवातीला डॉली लहान-मोठ्या लग्नांमध्ये किंवा फंक्शन मध्ये साडी, लेहंगा नेसवायची. परंतु जेव्हा तिचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले तेव्हा तिचे टॅलेंट जगासमोर येऊन तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

डॉलीने तिच्या करिअरची सुरुवात श्री देवी ला साडी नेसवून केली होती. डॉलीने सांगितले की तिच्या एका नातेवाईकाने साडी नेसण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी तिची श्रीदेवी सोबत ओळख झाली. जेव्हा तिने श्री देवी ला साडी नेसवली होती त्यावेळी श्रीदेवीने तुझ्या हातात जादू आहे अशी टिपणी डॉलीला दिली. श्रीदेवी ची ही गोष्ट तिने मनावर घेतली आणि पुढे हीच गोष्ट प्रोफेशन म्हणून स्वीकारली.

डॉलीने सांगितले की ती एकदा एका फंक्शन मध्ये गेली होती त्यावेळी नवरी लेहंगा घालत होती मात्र लेहंग्यावरची ओढणी सारखी सारखी खाली पडत होती. त्यानंतर डॉलीने तिची ओढणी अशाप्रकारे सेट केली कि ती नंतर पडलीच नाही. डॉली चे हे टॅलेंट फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी नोटीस केले व त्यांनी दिला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली. डॉलीने सब्यासाची सोबत सुधा काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *