बॉलिवुडमध्ये आता नव्या फळीचे इतके कलाकार तयार झाले आहेत कि त्यापैकी कोणाला कास्ट करावे असा प्रश्न निर्मात्यांना सतावत आहे. सध्या बॉलिवुडमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर अनेक विदेशी कलाकार सुद्धा आहेत. विशेष म्हणजे हे कलाकार विदेशी असुन सुद्धा भारतीय पद्धती त्यांनी चांगलीच स्विकारलेली दिसते. त्यामुळे हळुहळु कुठेतरी एकेकाळच्या भारतीय सुपरस्टार मागे पडत चालेल्या आहेत.
एकेकाळी ज्यांच्याकडे चित्रपटांसाठी निर्माता दिग्दर्शकांच्या रांगांच्या रांगा लागायच्या तिथेच त्याच कलाकारांना आता सध्या चित्रपट मिळेनासे झाले आहे. क्रिकेट विश्वातुन रिटायरमेंट घेतल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने शेतात काम करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या सोबतच अनेक बॉलिवुड कलाकारसुद्धा शेती करताना या लॉकडाऊन दरम्यान दिसले. यामध्ये बॉलिवुडची एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री सुद्धा आहे. ती अभिनेत्री गेली आठ वर्षे सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहे.
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून आपल्या सर्वांची लाडकी आणि सुप्रसिध्द अभिनेत्री ‘जुही चावला’ आहे. जुहीचे एक स्मित हास्य आज देखील लोकांना घायाळ करते. बॉलिवुडपासुन दूर झाल्यावर जुहीने आयपीएल टीम खरेदी केली. याव्यतिरिक्त ती सामाजिक कार्यांमध्येसुद्धा सहभागी असते. जुही गेल्या आठ वर्षांपासून शेती करत आहे. व त्या संबंधी जनजागृतीसुद्धा करत आहे. त्यामुळेच तिला वुमेन ऑफ इंडिया आर्गेनिक फेस्टिवल मुंबईचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनवले.
जुहीच्या मते एकदा जर तुम्ही ऑर्गेनिक फळ आणि भाज्यांची चव चाखलात तर तुम्ही बाजारातल्या केमिकल युक्त प्रोडक्टला विसरुन जाल. काही वर्षांपुर्वी जुहीने मांडवा येथे १० एकर जमीन विकत घेतली होती. त्या जमीनीवर ती सेंद्रिय पद्धतीने शेती करते. जुही चावला एक पर्यावरण प्रेमी तसेच कार्यकर्ती आहे. जुहीच्या मुंबईतील बंगल्यापाठी मांडवा हा भाग आहे. तेथेच ती काही तंज्ञाच्या टीमसोबत सेंद्रिय शेती करते.
तेथे असेही काही गरजु शेतकरी आहेत ज्यांच्याकडे त्यांची अशी शेतजमीन नाही त्यांना सुद्धा जुहीने जमीन कसायला दिली आहे. तिने हा निर्णय या लॉकडाऊनमध्येच घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडा हातभर लागेल अशी तिची भावना होती.
शेती करण्यापाठची प्रेरणा तिला अमीरखानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे मिळाल्याच जुहीने सांगितले.
जुहीने सांगितले कि सत्यमेव जयते या कार्यक्रमामुळे माझे डोळे उघडले. यामुळे मी केवळ सेंद्रिय शेतीच करते. वाडा मध्ये सुद्धा माझे फार्महाऊस आहे. तिथे सुद्धा मी शेती करते. त्यामुळे मी शेतकरीच आहे असे समजते. .
खरेतर मांडवा येथील जमीन जुहीच्या वडिलांनी खरेदी केली होती. त्यांच्या निधनानंतर त्या जमीनीची जबाबदारी जुहीने स्विकारली व ती तिथे शेती करु लागली. त्याकाळी चित्रपटांमुळे ती फारशी शेती कडे लक्ष द्यायची नाही मात्र आता हातात फारसे चित्रपट नसल्यामुळे आता ती तिचे संपुर्ण लक्ष शेतीकडेच देत आहे. तिच्या शेतात २०० हुन अधिक झाडे आहेत. यात चिकु, पपई आणि डाळींब यासांरख्या झाडांचा समावेश आहे. जुहीच्या पतीचे स्वत:चे रेस्टॉरंट आहे. यात त्यांच्याच शेतात पिकणाऱ्या फळ आणि भाज्यांचा वापर केला जातो.
काही दिवसांपुर्वी जुहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ती शेतात काम करत असल्याचे फोटो शेअर केले होते. यासाबत तिने कॅप्शन दिलेले कि हे पहा माझे नवे काम. इथे मी मेथी, कोथिंबीर आणि टोमॅटो उगवत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !