भारतीय चित्रपटसृष्टीमधला सर्वश्रेष्ठ चित्रपट बाहुबली हा अजुनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातली पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरतात. या चित्रपटातील अनुष्का शेट्टी आणि तिचा को-स्टार प्रभास यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा चर्चा आहेत मात्र या सर्व गोष्टींवर पुर्णविराम देत अनुष्का कोणा दुसऱ्याच व्यक्तीवर प्रेम करत असल्याचा खुलासा केला आहे.

अनुष्का ज्या व्यक्तीवर प्रेम करते तो व्यक्ती कोणी सर्वसाधारण माणुस किंवा कोणी अभिनेता नाही तर भारतीय क्रिकेट टीमचा एक खेळाडु आहे. या बाबतीतला खुलासा अनुष्काने एका वेबपोर्टलला दिला होता. या वेळी तिचे चाहते सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यावेळी तिच्या एका फॅनने तिला विचारले कि तिला कोणता क्रिकेटर जास्त आवडतो.

यावर तिने सांगितले कि मला राहुल द्रविड खुप आवडतो. मी जेव्हा वयात येत होती तेव्हा पासुन मला राहुन द्रविड आवडतो. ते माझे क्रश आहेत. एक काळ तर असा होता जेव्हा मी त्यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

बाहुबली चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रभास आणि अनुष्काचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या येत होत्या. सोबतच त्यांच्या अफेअरच्या चर्चासुद्धा होत होत्या. पण या दोघांनी त्यांच्या अफेअरची कधीच अधिकृतरित्या घोषणा केली नव्हती. बाहुबलीच्या आधीही या दोघांनी त्यांच्या दर्शकांना त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री दाखवली होती.

तसे पहायला गेले तर ही पहिलीच वेळ नाही की राहुन द्रविड आपला क्रश असल्याचे सांगण्याची कोणत्याही अभिनेत्रीची ही पहिली वेळ नाही. यापुर्वी कॅटरीना कॅफनेसुद्धा तिच्या एका इंटरव्ह्युमध्ये राहुल द्रविडचे नाव घेतले होते. कॅटरिनाला जेव्हा तिच्या आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले गेले तेव्हा तिने मला राहुल द्रविड खुप आवडतो असे उत्तर दिले होते.

ते खऱ्या अर्थाने एक जेंटलमॅन आहेत असे कॅटरिना म्हणाली होती. राहुल कधीच आक्रमक, उत्तेजित आणि निराश होत नाही. मी आजपर्यंत त्यांच्यासोबत तीन शब्दांहुन जास्त कधीच बोलली नाही ते एक लाजुळ व्यक्तिमत्व आहे.

राहुल द्रविडला द वॉल या नावाने ओळखले जाते. त्यांच्यासारखा बॅट्समन आजपर्यत कोणीच झालेला नाही असे म्हटल्यास हरकत नाही. खेळा सोबतच त्यांच्या जेंटलमन स्टाईलची सुद्धा दुनिया दिवानी आहे. टिम इंडियाच्या माजी कॅप्टन असेलेल्या द्रविडने टेस्ट आणि वनडे मध्ये अनेक उत्कृष्ठ खेळ खेळले. सध्या भलेही ते फिल्डपासुन दुर असले तरी क्रिकेट चाहात्यांच्या मनात त्यांची जागा अजुनही कायम आहे.

बाहुबली चित्रपटानंतर अनुष्का साऊथकडील सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली. आज तिचे करोडो फॅन्स आहेत. तिने साऊथकडील लिंगा, रुद्रमादेवी, सिंघम 2, भागमती यांसारख्या काही चित्रपटांत काम केले आहे. अनुष्का दिसायला खुप सुंदर आहे. आजच्या काळात ती एका चित्रपटासाठी २.५ ते ३ करोडो रुपयांपर्यंत फि घेते. बाहुबली या चित्रपटात तिने अमेरेंद्र बाहुबलीच्या पत्नीची भुनिका साकारली होती. अमेरेंद्र बाहुबली हे पात्र प्रभासने साकारले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *