काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत होता. ज्यात एका लग्नात फोटोशुट दरम्यान फोटोग्राफर फोटो काढते वेळी नवरीच्या खुप जवळ जावुन फोटो काढतो त्यावेळी नवरदेव रागात त्या फोटोग्राफरला कानशीलात वाजवतो.

नवरदेवाचे हे रौद्र रुप पाहुन नवरीला तिचे हसु आवरत नाही आणि ती स्टेजवर बसुन जोरजोरात हसु लागते. काही दिवसांपुर्वीच हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर झाला होता. हा व्हिडीओ ४५ सेकंदाचा असुन तो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. घडलेली ही घटना खरी कि खोटी याबाबतचे सत्य आता समोर आले आहे. नक्की काय घडलेले.

सर्वात आधी जाणुन घेऊ त्यावेळी स्टेजवर काय घडलेले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता कि, फोटोशुटवेळी फोटोग्राफर आधी नवरा नवरीचे कपलशुट करत असतो. तोपर्यंत सर्व काही ठिक असते. मात्र नंतर जेव्हा फक्त एकट्या नवरीचा फोटो काढायला जातो तेव्हा सगळं बिघडतं. कारण फोटो नीट येण्यासाठी फोटाग्राफर नवरीच्या चेहऱ्याला हात लावतो तेव्हा ते पाहुन नवरा रागात त्या फोटोग्राफरला का*ना*खा*ली मारतो आणि त्याला स्टेजखाली जायला सांगतो. नवऱ्याचा तो अवतार पाहुन फोटोग्राफर सुद्धा चकीत होतो.

नवरीने सांगितले त्या फोटोमागील रहस्य – मात्र आता या व्हिडीओमागील रहस्य समोर आले आहे. यामागचे रहस्य स्वत: त्या व्हिडीओतील नवरीने सांगितले. ती म्हणाली की तो व्हीडीओ म्हणजे वास्तव नसुन केवळ एका चित्रपटातल्या शुटींगचा हिस्सा होता. व्हिडीओत दिसणारी ती नवरी छत्तीसगढ मधील एक नामांकित अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव अनिकृती चौहान असे आहे. अनिकृतीने तिच्या ट्विटरवर तो व्हिडीओ शेअर करत म्हटले कि हा माझ्या चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचा व्हिडीओ आहे.

https://twitter.com/Ease2Ease/status/1357675009905291264

अनिकृतीने सांगितले कि तो व्हिडीओ तिचा येणारा चित्रपट डार्लिंग प्यार झुकता नही च्या शुटींग दरम्यान रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक तिला लग्नाच्या शुभेच्छा पाठवु लागले. त्यामुळे अनिकृतीला ते समोरुन सांगावे लागले कि तिचे लग्न अजुन झालेले नाही. तो व्हिडीओ शेअर करण्यासाठी अनिकृतीने रेणुका मोहन यांचे आभार मानले आहेत.

कोण आहे अनिकृति चौहान – अनिकृति चौहान ही एक अभिनेत्री असुन ती अधिकतर छत्तीसगढच्या चित्रपटांमध्ये काम करते. तिने तिच्या फिल्मी करीयरची सुरुवात २०१७ मध्ये आलेल्या ‘ले चल नदिया के पार या चित्रपटातुन केली होती. या व्यतिरिक्त तिने ’36 गढ़ के हैंडसम’ और प्रेम सुमन या चित्रपटात सुद्धा काम केले आहे. अनिकृती सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते.

अनिकृतीचा तो व्हिडीओ रेणुका मोहनने ‘मुझे तो इस दुल्हन से प्यार हो गया’ असे कॅप्शन देऊन शेअर केले होते. या व्हिडीओलो आता पर्यंत ९ लाखहुन अधिक व्ह्युज मिळाले आहेत. व्हिडीओ शेअरल करताना त्यांनी असे ही लिहीले कि हा व्हीडीओ खरा आहे कि खोटा आहे, कि प्रॅंन्क आहे हे मला माहित नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *