काही दिवसांपुर्वीच अंबानी कुटुंबात छोट्या सदस्याचे आगमन झाले. मुकेश अंबानी यांचा मुलगा आणि सून म्हणजेच आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. मुकेश अंबानी व श्लोकाचे लग्न १९ मार्च २०१९ ला झाले होते. या दोघांचे भव्यदिव्य लग्न बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या जियो वर्ल्ड सेंटरमध्ये झाले होते. अर्थात हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाचे लग्न असल्यामुळे तेथील अरेंजमेंट, कपडे, दागदागिने सुद्धा महागच होते.

त्यातच उत्सवमुर्ती असलेल्या नवरीने म्हणजेच श्लोका मेहताने लाल रंगाचा लग्नाचा जोडा घातला होता. त्यात ती खुपच सुंदर दिसत होती. या शाही विवाहसोहळ्याला देशा-विदेशातील मोठमोठ व्यक्ती उपस्थित होते. या लग्नात ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, त्यांची पत्नी चेरी ब्लेअर आणि संयुक्त राष्ट्राचे पुर्व महासचिव बान कि मनु सुद्धा आले होते. याव्यतिरिक्त राजकिय, क्रिडा आणि चित्रपटसृष्टीतील मोठमोठ व्यक्ती उपस्थित होते. ११ मार्च २०१९ ला त्याच्या लग्नाचे रिसेप्शन जियो सेंटरमध्येच पार पडले.

असे म्हटले जाते कि नीता अंबानी यांनी सूनमुख विधीवेळी सर्वात महागडी भेटवस्तु दिली होती. आता व्यक्ती जर श्रींमत घराण्यातील असतील तर त्यांच्या भेटवस्तुसुद्धा महागड्याच असणार यात काही वावगे नाही. तुम्हाला काय वाटते नीता अंबानी यांनी किती रुपयाची भेटवस्तु त्यांच्या सूनेला दिली असेल.

दोन, तीन, पंचवीस, तीस किंवा जास्तीत जास्त शंबर करोड रुपयांपर्यंत…..? तुमचा अंदाज जर इथ पर्यंतच असेल तर तो चुकीचा आहे कारण नीता अंबानी यांनी त्यांच्या सूनेला तब्बल ३०० करोड रुपयांचा हार भेटवस्तु म्हणून दिली. एवढ्या महागड्या भेटवस्तुबद्दल सर्वसामान्य लोक स्वप्नातसुद्धा विचारत करत नाही..मात्र एवढे महागडे भेटवस्तु देऊन नीता यांनी त्यांच्या सुनेवर केवढे प्रेम आहे हे दाखवुन दिले.

नीता अंबानी यांनी त्यांच्या सुनेला ३०० करोड रुपयांचा महागडा हिऱ्यांचा हार गिफ्ट केला होता. सासूबाईंनी दिलेली एवढी महागडी भेटवस्तु पाहुन श्लोका खुप खुष झाली होती. विशेष म्हणजे केवळ नीताच नाही तर ईशा अंबानीनेसुद्धा तिच्या वहिनीला महागडी भेटवस्तु दिली. ईशाचे सुद्धा तिच्या वहिनीवर खुप प्रेम आहे. त्यामुळे तिने भेटवस्तु म्हणुन करोडो रुपयांचा बंगला गिफ्ट केला. या दोघी नंनद भावजय या नात्याव्यतिरिक्त चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहेत.

श्लोका मेहता बद्दल सांगायचे झाल्यास ती हिऱ्यांचे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे. श्लोकाने तिचे शिक्षण धीरुभाई अंबानी स्कुलमधुनच पुर्ण केले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ती प्रिंस्टन यूनिवर्सिटीला गेली. तिथे तिने एंथ्रोपॉलिजीचे शिक्षण घेतले. त्यानंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्समधुन लॉमध्ये मास्टर डिग्री केली. डिग्री घेतल्यानंतर श्लोकाने तिच्या वडिलांच्या रोसी ब्लू फाउंडेशन मध्ये डायरेक्टरचे पद सांभाळले. याशिवाय ती कनेक्टफॉर नावाच्या संस्थेची को-फाउंडर आहे. ही संस्था एनजीओला मदत करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *