प्रेम ही या जगातील अशी गोष्ट आहे जी मिळावी अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. मात्र ते मिळवण्याचे प्रयत्न काहीच जण करतात. कोणावर प्रेम करणे किंवा कोणीतरी आपल्यावर प्रेम करणे या दोन्ही गोष्टी नशिबानेच मिळतात. पण देवाने प्रत्येकाची जोडी कोणासोबत तरी बनवुन ठेवलेलीच असते असे म्हटले जाते. त्यामुळे काही लोकांना त्यांचे प्रेम खुप लवकर मिळते तर काहींना ते मिळायला खुप वेळ लागतो.

आपल्या आजुबाजुला बरेच असे लोक असतात ज्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे प्रेम असते. पण करीयर बनवण्याच्या नादात ते त्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही पण जर अशा प्रकारचेच सिंगल असाल तर तुम्ही तुमच्या काही सवयी सोडा ज्यामुळे कदाचित तुमची जोडी सुद्धा बनु शकेल.

१. वेळ दवडु नका – काही वेळेस तुम्हीला कोणीतरी आवडत असते. मात्र ती गोष्ट समोरच्याने आपल्याला बोलावी अशी त्यांची इच्छा असते. जर तुम्ही प्रेमात पडला असाल तर तुम्हाला ते सांगण्यास काही हरकत नाही. त्यामुळे जर तुम्ही मनापासुन कोणावर प्रेम करत असाल तर ते व्यक्त करायला जरापण घाबरु नका. कदाचित त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही आवडत असाल आणि ती तुम्हाला लगेच हा बोलेल.

२. स्वत:मध्ये आनंद शोधा – काही वेळा लोक स्वत: सिंगल राहतात आणि त्यांचे मित्र रिलेशनशिप मध्ये असतील तर त्यांच्यावर जेलस होतात. तुम्हीसुद्धा जर या जेलसीमुळे रिलेशनमध्ये येऊ इच्छिता तर ती खुप मोठी चुक ठरु शकेल. तुम्हाला स्वत:ला जोपर्यंत कोण आवडत नाही तोपर्यंत कधीही दुसऱ्या कोणाला पाहुन नात्यात कधीच येऊ नका. जर तुम्हाला वेळच घालवायचा असेल तर त्या गोष्टींमध्ये घालवा ज्यामधुन तुम्हाला आनंद मिळेल. यामुळे तुम्ही कुठल्याही फेक रिलेशनशीपमध्ये येणार नाही तसेच आनंदी सुद्धा रहाल. जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल तेव्हाच तुमच्यावर सुद्धा कोणीतरी प्रेम करेल.

३. मनातल्या इतर गोष्टींना दुर्लक्षित करा – जेव्हा तुम्ही खुप मोठा काळ सिंगल असाल आणि अचानक तुमच्या आयुष्यात असे कोणीतरी येते ज्याला किंवा जिला पाहातच ती आपली व्हावी अशी इच्छा मनात येते. तुम्ही त्या व्यक्तीच्या कधी प्रेमात पडता हे तुम्हालासुद्धा कळत नाही. त्यामुळे त्यावेळी मनातील काही इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि केवळ तेच करा ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. यासाठी तुम्ही तुमचा एखादा छंद पु्र्ण करु शकता किंवा काही नवे शिकु शकता.

४. जास्त अपेक्षा ठेवु नका – काही सिंगल व्यक्तींना रिलेशनमध्ये येण्याची खुप इच्छा असते. पण काही वेळेस तसे होत नाही. यामागचे कारण म्हणजे ते त्यांच्या होणाऱ्या जोडीदाराकडुन अनेक अपेक्षा ठेवतात. कोणीही कधीच परफेक्ट नसते हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे काही वेळे परफेक्ट व्यक्तीच्या शोधात तुम्ही अनेकदा तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या व्यक्तींना तुमच्यापासुन दुर करता. त्यामुळे कुठल्याही अति अपेक्षा ठेवु नका तसेच परफेक्शनच्या पाठी लागु नका.

५. सवयी बदला – काहीवेळेस आपण सिंगल का आहोत हेच काही जणांच्या लक्षात येत नाही. काही वेळेस सर्व काही चांगले असुनसुद्धा तुमच्या काही सवयींमुळे लोक तुम्हाला डेट करण्यास नकार देत असतील. अशावेळी तुमच्या सवयी आणि रुटीन मध्ये थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा. थोडे फिरा, तुमच्या वागण्यात थोडा बदल आणा. यामुळे तुम्हाला सुद्धा चांगले वाटेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *