बॉलिवुड इंडस्ट्री ही वेगवेगळ्या कलाकारांनी गजबजली आहे. इथे आपले नशिब आजमवायला वेगवेगळे कलाकार येतात. मात्र ज्यांचे नशीब बलवत्तर असेच लोक इथे टिकतात. तर काहींना त्यासाठी गॉडफादर ची आवश्यकता असते. एवढे असुनही बॉलीवुडवरील खान मंडळींचे वर्चस्व कमी झालेली नाही.

या खान मंडळीत बॉलिवुडचा बादशहा शाहारुख खान, भाईजान सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खानची वर्णी लागते. पण तसे पहायला गेले तर अभिनेता सैफ अली खान सुद्धा यामध्ये सहभागी असायला हवा मात्र तरी त्याचे नाव यात गणले जात नाही.

सध्याच्या काळात सैफ अली खान इंडस्ट्रीमध्ये एकापाठोपाठ एक चित्रपट करत असला तरी त्याच्या करीयरमध्ये अनेक चढउतार आले. करीयरच्या मोठ्या काळात त्याला एकही हीट चित्रपट मिळाला नव्हता. याच कारणामुळे तो खानमंडळीच्या यादीत सहभागी झालेला नाही. खरेतर यात सैफचीच चुक होती. त्याने त्याकाळी अनेक चित्रपट करण्यास नकार दिला होता जे रिलिज झाल्यावर सुपरहिट ठरले. सैफने नाकारलेल्या चित्रपटांमधुन शाहारुख आणि सलमान मात्र सुपरहिट ठरले.

दिल चाहता है, सलाम नमस्ते और हम तुम यांसारख्या हिट चित्रपटांत काम करणाऱ्या सैफने बॉलिवुडचा आयकॉनिक चित्रपट ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे ची ऑफर नाकारली होती. याच चित्रपटामुळे शाहारुख खान प्रसिद्धीच्या एका वेगळ्याच शिखरावर पोहचला होता. असे म्हटले जाते कि या चित्रपटात लीड रोल करण्याची पहिली ऑफर सुरुवातीला हॉलिवुड स्टार टॉम क्रुझला देण्यात आली होती.

सैफच्या चुकीमुळे शाहारुखला मिळाले स्टारडम – ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात इंडो-अमेरिकन अफेअरची कहाणी होती. मात्र यश चोपडा यांनी चित्रपटाची थीम बदलण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सैफ अली खानला या चित्रपटाची ऑफर दिली. मात्र सैफने ती ऑफर नाकारल्यामुळे शाहारुखला ती संधी देण्यात आली.

शाहारुखने या संधीचे सोने करत त्यात जबरदस्त अभिनय केला आणि तो चित्रपट सुपरहिच ठरला. यामुळे शाहारुखच्या लोकप्रियतेत मोठ्या संख्येने वाढ झाली. डिडिएलजे हा बॉलिवुडमधील सर्वात जास्त सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

सैफच्या नकारामुळे सलमान खान चमकला – तसे पहायला गेले तर सैफने अनेक चित्रपट सोडले मात्र डिडिएल जे नंतर कोणता चित्रपट सोडुन त्याला जास्त दुख झालं असेल तर ते म्हणजे कुछ कुछ होता है. कारण या चित्रपटात सुद्धा सैफला घेण्याचे ठरले होते मात्र सैफने नकार दिल्यावर सलमानला त्या चित्रपटात घेण्यात आले. या चित्रपटात शाहारुख आणि सलमानला जबरदस्त लोकप्रियता मिळाली. हा चित्रपटसुद्धा सर्वाधिक चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक म्हणुन गणला जातो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *