विश्वसौंदर्यवती तसेच बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन काही दिवसांपुर्वी बेंगलोरला जात होती. त्यावेळी मुंबई एअरपोर्ट वरती तिच्या मुली सोबत म्हणजेच आराध्या सोबत दिसली होती. ऐश्वर्याला एक अभिनेत्री असल्यामुळे सतत कॅमेरासमोर राहायची सवय आहे. मात्र आता हीच सवय आराध्याला देखील तिच्या आईमुळे लागलेली दिसते.

कारण एअरपोर्टवर जेव्हा या माय-लेकींना पाहिले गेले त्यावेळी मिडियाने त्यांचे फोटो काढायला सुरुवात केली. तेव्हा छोट्या आराध्या ने सुद्धा तिच्या आईप्रमाणे गोड हसत कॅमेरामनला प्रतिसाद दिला. या सर्व गोष्टी दरम्यान एक गोष्ट मात्र नजरेआड झाली. जी आमच्या लक्षात आलेली आहे. आम्ही बोलत आहोत ते ऐश्वर्या राय च्या फोन कव्हर बद्दल.

सध्याच्या काळात मोबाईल हा सर्वांच्याच जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे मोबाईल आला की त्यासोबत त्याचे बॅक कव्हर सुद्धा येतेच. ऐश्वर्या राय ने सुद्धा तिच्या व्यक्तीमत्वाला साजेसे असे फोन कव्हर ठेवले आहे. तिच्या कवर वर ARB असे लिहिले आहे. या तीन अद्याक्षरांचा अर्थ ऐश्वर्या राय बच्चन कसा होतो. या व्यतिरीक्त ती AB सुधा ठेवू शकली असती किंवा AAA म्हणजेच ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक असे देखील ठेवू शकली असती.

यापूर्वीही करीना कपूर-खान ने तिचा फोन कवर वर वर्किंग फ्रॉम नाईन टू वाइन असे लिहिले होते. हे वाक्य तिच्या कामसू लाईफ स्टाईल चे स्पष्टीकरण देते. यासोबतच राणी मुखर्जी ने सुद्धा तिच्या मुलीच्या म्हणजे अदिरा च्या जन्मानंतर तिच्या नावाचे लॉकेट गळ्यात घालताना दिसली होती यावरून अदिरा तिच्या किती जवळची आहे हे स्पष्ट होते.‌ त्यामुळे ऐश्वर्याच्या मोबाईल कव्हर वरून तिच्या जवळचे कोण आहे हे तुम्ही समजू शकता.

ऐश्वर्या बद्दल सांगायचे झाल्यास ती माजी मिस वर्ल्ड तसेच बॉलिवूड अभिनेत्री आहे. १९९४ मध्ये तिने मिस वर्ल्डचा किताब जिंकून स्वतःची ओळख संपूर्ण जगभरात केली होती. तिला एक सौंदर्यवती म्हणून ओळखले जाते. तिचे चाहते केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण जगभर पसरले आहेत. ऐश्वर्या राय-बच्चन ही एकमेव अशी सेलिब्रेटी आहे जिने कोको कोला आणि पेप्सी या दोन्ही ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे.

ऐश्वर्याने नववीत असताना एका केमिकल ब्रँड साठी जाहिरातीत काम केले होते. सुरुवातीला ऐश्वर्या तिचे शिक्षण पूर्ण करून मॉडेलिंग करू इच्छित होती. मात्र ती मेडिकल स्टूडंट होण्यापूर्वी तिच्या सौंदर्यामुळे तिला वेगवेगळे ऑफर येत होत्या. त्यामुळे तिने यातच करियर करण्याचा पर्याय निवडला. मिस वर्ल्ड मध्ये ऐश्वर्या राय आतापर्यंत सर्वात सुंदर स्त्री म्हणून दोनदा निवडले गेले आहे.

तिने ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी सलमान खान सोबतच्या रिलेशनशिपमुळे ती प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर विवेक ओबेरॉय सोबत सुद्धा तिचे रिलेशन असल्याचे म्हटले जात होते. मात्र तिने अभिषेक बच्चन सोबत लग्न केले. सध्या त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *