काही दिवसांपासुन अनेकांच्या व्हॉटस्अप स्टेटसला एका मुलाचा व्हिडीओ पाहायला मिळतो. त्याचे मोटीव्हेश्नल बोलणे अनेकांच्या मनाला भावणारे आहे. अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेला तो तरुण म्हणजे आरजे राघव. आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला त्याच्याबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत.
आरजे राघव हा हॅलो एफएम चॅनलमध्ये काम करतो. या चॅनलवरील त्याचा आरजे राघवस् हा शो खुप प्रसिद्ध आहे. या शोमध्ये तो नेहमीच त्यांच्या प्रेक्षकांना नेहमी खुष रहा…जगा आणि जगु दा असा जगण्याचा मंत्र देत असतो. त्याला बेस्ट इव्हनिंग जॉक अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. ९४.३ माय एफ एम वर तो २०१७ पासुन काम करतो.
त्याचे पुर्ण नाव राघव दिवेदी आहे. राघवचा जन्म ५ जुनला कामपुरमध्ये झाला. तिथेच त्याचे शालेय शिक्षण पुर्ण झाले. त्यानंतर त्याने कॉमर्स मध्ये मोहनलाल सुखादिया युनिव्हर्सिटीमधुन शिक्षण घेतले आहे. सध्या तो छत्तीसगढमध्ये बिलासपुर येथे राहतो. राघवने वयाच्या केवळ २५ व्या वर्षी एवढी प्रसिद्धी मिळावली आहे. त्याची रास मिथुन रास आहे.
राघवने ‘जोश talks’ या प्रसिद्ध चॅनेल सोबत एका कार्यक्रमात बोलताना त्याच्या आयुष्यातील खडतर प्रवासाबद्दल सांगितले होते. त्याने सांगितले कि, त्याच्या भाड्याच्या घरात तो त्याचे आईवडिल, व बहिण राहायचे. अचानक एके दिवशी त्याचे वडिल गायब झाले. त्यांना शोधण्याचा त्याच्या कुटुंबाने खुप प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवाय वडिल अचानक नाहीसे झाल्यामुळे त्याला घरातल्या विमा, उधारी, येणी यांसारख्या काहीच गोष्टी त्याला माहित नव्हत्या.
शिवाय त्यावेळी त्यांच्या घरात केवळ २ हजार रुपयेच होते. त्यात त्याला चांगली नोकरीपण नव्हती. त्यामुळे घर कसे चालावायचे.. बाबा पण सापडत नाही यांसारख्या संकटांमुळे त्याच्या मनात आ*त्म*ह*त्ये*सारखे विचारपण येऊन गेले. पण अचानक त्याच्या एका दुरच्या नातेवाईकाने त्याला १० हजार रुपयांची मदत केली. व यापुढे मीच काय इतर कोणीही तुला मदत करत बसणार नाही.
त्यामुळे तुला हे १० हजार रुपये आणि तुझ्याकडे असलेले २ हजर रुपये खुप विचार करुन खर्च करावे लागतील असे सांगितले. पैसे मिळाल्यावर राघव ने घर मालकाचे पैसे दिले पण त्या घरमालकाने सुद्धा वीजेच्या बीलाचे एक्सट्रा पैसे कापुन घेतले. त्याच्या बहिणीनेपण मेहनतीने काम करायला सुरुवात केली. राघव सुरुवातीपासुन रेडीओसाठी काम करायचा.
अशातच त्याला अजुन एका रेडीओची ऑफर आली. तो शो त्याने स्विकारला आणि एका वर्षातच त्याने त्या शोसाठी बेस्ट इव्हनिंग जॉक अवॉर्डसुद्धा मिळाला. सलग दुसऱ्या वर्षीसुद्धा त्याला तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो कानपुरला परत आला. या दोन वर्षात तो आ*त्म*ह*त्या करण्याच्या विचाराला पुर्णपणे विसरुन गेलेला. या सर्व परिस्थितीत त्याने कामावर फोकस केल्यास घरातील कोणताही प्रोब्लेम लक्षात येत नाही.
सततच्या मेहनतीने व कामाच्या फोकस मुळे त्याने स्वत:चे घर सुद्धा खरेदी केले. एके काळी त्याच्याकडे केवळ 2 हजार रुपये होते. पण मेहनतीने त्याने घर सुद्धा खरेदी केले. या सर्व परिस्थितीत त्याला त्याच्या बहिणीने खुप सपोर्ट केला. त्याच्या खडतर प्रवासाने त्याला खुप काही शिकवले आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करत त्याने आजचे त्याचे जनमानसातले त्याचे स्थान पक्के केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !