कोरोनामुळे संपुर्ण जगभरात लॉकडाउन करण्यात आलेला. कोणीच कुठे जाऊ शकत नव्हतं, कुठली महत्वाची कामे करायला सुद्धा कोणाला घराबाहेर पडता येत नव्हत. त्यामुळे खुप काम अडुन राहिलेली. शिवाय विद्यार्थ्यांचे अभ्यास सुद्धा होत नव्हते. त्यामुळे या सर्व अडचणींवर पर्याय म्हणुन झुम, मिट यांसारख्या अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. यावर ग्रुप कॉलचा सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत.

ऑनलाइन क्लास सुद्धा या अॅपस् च्या मदतीनेच घेतले जातात. यामुळे घराबाहेर न पडता सुद्धा मिटींग अटेंड करु शकता. पण झुम अॅपमुळे श्वेता हे नाव सध्या खुप चर्चेत आले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ दिसते की एक प्रोफेसर ऑनलाइन लेक्चर घेत असतात. त्या ऑनलाइन लेक्चर दरम्यान त्या प्रोफेसर ची पत्नी त्यांच्याजवळ येते आणि त्यांना किस करण्याचा प्रयत्न करते. यावर प्रोफेसर त्यांच्या पत्नीला मागे जाण्यास सांगतात. व बोलतात की, मी ऑनलाईन क्लास घेत आहे. यावर त्यांची पत्नी एका कोपऱ्यात जाऊन हसायला लागते. ही संपूर्ण घटना ऑनलाइन क्लास दरम्यान कॅमेऱ्यात कैद होते.

या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला. या सर्व घटनेवरून असे दिसून येते की वर्क फ्रॉम होम हे वाटते तितके सोपे नाही. यामध्ये अशा अडचणी सोबतच इंटरनेट, लाईट, यांसारख्या गोष्टी सुद्धा सांभाळाव्या लागतात.

तुम्हाला जर माहित नसेल कोण आहे श्वेता तर त्याचे आम्ही तुम्हाला उत्तर देतो. श्वेता एक मुलगी आहे जी झुम कॉलचा माईक ऑफ न करता तिच्या मैत्रिणीसोबत कॉलवर बोलत होती. श्वेता आणि तिची मैत्रीण राधिका यांच्यात झालेले संभाषण वर्च्युल क्लासमध्ये उपस्थित असलेल्या १११ जणांनी ऐकले. श्वेता फोनवर बोलते वेळी तिला इतर व्यक्ती माईक ऑफ करण्यासाठी आवाज देत होते. मात्र कदाचित तिने आवाज म्युट करुन ठेवल्यामुळे त्यांचा आवाज तिच्या पर्यंत पोहोचला नाही.

श्वेता फोनवर तिच्या मैत्रिणीला एका मुलामुलीच्या रिलेशनशिप बद्दल सांगत होती. त्यांचे हो बोलणे त्याच क्लासमधील एकाने रेकॉर्ड केले जे सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या श्वेता ट्विटरवर टॉप ट्रेंडला आहे. तिच्या नावाने अनेक मीम्ससुद्धा बनत आहे. श्वेता सोबत त्या मुलावर सुद्धा खुप मीम्स बनत आहे ज्याने त्याच्या प्रेमप्रकरणाबद्दस इंत्यंभूत माहित श्वेताला विश्वासाने सांगितलेली.

साधारण ६-७ मिनीटे श्वेता तिच्या मैत्रिणीला त्या मुलाबद्दल सांगत होती. त्या मुलाचे दुसऱ्याच एका मुलीसोबत अफेअर होते आणि त्याने ती गोष्ट श्वेताला विश्वासाने सांगितलेली. मात्र ती गोष्ट श्वेताने तिच्या मैत्रीणीला सांगताना त्या झुम कॉलवर उपस्थित असलेल्या १११ लोकांनी ऐकली. दरम्यान तिला अनेकांनी माईक ऑन आहे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ते तिला ऐकु गेले नाही.

या सर्व प्रकरणावरुन सर्वांनी धडा घेतला पाहिजे कि कोणत्या वर्च्यल क्लास दरम्यान माइक आणि कॅमेऱ्याबद्दल विशेष काळजी घ्या.  मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *