तैमूर नंतर हे असू शकत करीना आणि सैफच्या मुलाचे नाव, करीनाची जुनी मुलाखत व्हायरल !

76

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे सैफ अली खान व करिना कपूर. करिनाने शनिवारी दुसऱ्या बाळाला ब्रीच कैंडी हॉस्पिटलमध्ये जन्म दिला. अद्याप त्यांच्या नव्या बाळाचा फोटो सामोरं आलेला नाही, परंतु त्या बाळाचं नाव काय ठेवायाचं यावर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यांचा पहिला मुलगा तैमूर अली खान हा फारच प्रसिद्ध झाला आहे आणि सोबतच त्याच्या संबंधित काही वादविवाद देखील झलेले आहेत.

हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे, त्यावरून नेटकर्मींचा असा अंदाज आहे की करिना आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव फैज ठेवणार आहे. तर हे नाव सैफ अली खानने आपल्या पहिल्या मुलाच्या वेळेस सुचवले होते, परंतु करिनाला हे नाव फारसे आवडले नव्हते.

२०१८ साली एका मुलाखतीमध्ये या नावासंबंधितचा एक किस्सा तिने सांगितला होता, “मी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा एक रात्र आधी सैफने मला विचारले, आपल्याला मुलगा होणार का? तुला खरंच आपल्याला मुलगा व्हावा असं वाटतंय? चल मग आपण त्याचं नाव बदलून फैज असं ठेवू. हे खूप रोमँटिक आहे.

यावर करिनाने उत्तर दिले की, मी काही म्हटलं नाही असं, जर आपल्याला मुलगा झाला तर तो मला असं वाटत की तो एक यो*द्धा फाईटर असावा. तैमूरचा अर्थ फौलाद असा आहे आणि मी एक फौलादी पुरुषाला जन्म देणार. मला गर्व आहे की माझ्या मुलाचे नाव तैमूर आहे.”

करिनाने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यानंतर यावर काही संघटनांनी याबद्दल विरोध दर्शवला. तर सूत्रांच्या माहितीनुसार, हे नाव फारस आणि मध्य आशियामधील तैमूर साम्राज्य स्थापन करणाऱ्या आणि १३९८ मध्ये भारतावर आक्रमण करणाऱ्या तैमूरशी प्रेरित असल्याचे म्हटले गेले. तर सैफने या नावाचा अर्थ फौलाद असल्याचे सांगितले. सैफ आणि करिनाने त्यांच्या मुलाचे पर्शियन भाषेतील नाव ठेवले आहे. सोबतच सैफ म्हणाला क्रू*र शासक व भारतावर आक्रमण करणाऱ्या राजाचे नाव तिमूर लिंग होते ते तैमूर नव्हते.

एका रेडिओ शो दरम्यान करीना म्हणाली होती, ‘तैमूरवरील संपूर्ण वादानंतर सैफ आणि मी याबद्दल विचारही करू शकत नाही. आम्ही ते एका संधीसाठी सोडतो. तुम्हाला पुन्हा सरप्राईज देऊ. सैफ आणि करीनाने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी मुंबईत लग्न केले. २० डिसेंबर २०१६ रोजी त्यांचा मुलगा तैमूर अली खानचा जन्म झाला. तर सध्या त्यांच्या नव्या बाळाचे फोटो व नाव याकडे सर्व चाहत्यांच्या नजरा आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !