उत्तरप्रदेशातील बागपतमध्ये सोमवारी दोन ग्रुपमध्ये लाठी-दांड्याने मा*रा*मा*री झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा वाद दोन चाटच्या दुकानदारांच्या मध्ये सुरु होता. त्याचे झाले असे की कोतवाली क्षेत्रात दोन चाटची दुकाने होती. त्यातील एक दुकानदार दुसऱ्या दुकानात गेलेल्या ग्राहकांना आपल्या दुकानात बोलवत होता.

यावरुन हा वाद सुरु झाला आणि मग काय प्रत्येकाने या वादात हात साफ करुन घेतला. सध्या या व्हिडीओवर खुप मीम्स व्हायरल होत आहे. या मध्ये दुकानदाराच्या हेअरस्टाइलची तुलना लोक आइनस्टाइनशी आणि कपिल शर्मा शो मधील डॉक्टर गुलाटी सोबत करत आहेत. करत आहे.

त्या दुकानदाराचे नाव हरेंद्र असे आहे. त्याने अशी हेअरस्टाइल का ठेवली असा प्रश्न जेव्हा लोकांनी त्याला विचारले तेव्हा त्यांने सांगितले कि मी साईबाबांचा भक्त आहे व त्यांची तो नियमित पुजा करतो. ते त्यांचे केस हरिद्वारमध्ये विसर्जित करतात आणि दोन वर्षांमध्ये एकदाच कापतात. त्यांची हेअरस्टाइल दुनियातले महान वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांच्याशी मिळता जुळता आहे.

या भांडणाचे लोकांनी तर मीम्सपण बनवायला सुरुवात केली आहे. काहींनी तर अनुराग कश्यपने जर यावर चित्रपट बनवला तर त्याचे पोस्टर कसे असेल हे देखील सांगितले आहे. आज तक वृत्त वाहिनीशी बोलताना हरेंद्र यांनी सांगितले कि माझे चाटचे दुकान आहे. माझे ज्यांच्याशी भांडण झाले त्यांचे नाव कश्यप असे आहे. आमच्यात ग्राहकांवरुन भांडण झाले.

हरेंद्र यांचे म्हणणे आहे कि कश्यप हरेंद्र यांच्या दुकानात जाणाऱ्यांना भडकवतात. या दुकानात रात्रीचेच सामान विकले जाते असे खोटे ग्राहकांना सांगितले जाते. त्यांमुळे त्यांचे ग्राहक सामान पुन्हा द्यायला येतात. कश्यपने दोन महिन्यांपुर्वीच दुकान लावले आहे तर हरेंद्र यांचे दुकान मागील ४० ते ५० वर्षांपासुन तेथे आहे. त्यांनी ४-५ वेळा माझ्या दुकानाबाबत अशा अफवी पसरवल्या आहेत. त्याच्यामुळे अनेकदा मा*रा*मा*री झाल्या आहेत.

हे असे असले तरी हरेंद्र यांची हेअरस्टाइल मात्र या भांडणात खुप व्हायरल झाली. काही वर्षांपुर्वी कपिल शर्माच्या शो मध्ये महशुर गुलाठी हे पात्र सुद्धा आइनस्टाइन च्या लुकशी मिळते जुळते होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *