बॉलिवुड अभिनेत्रींची जादु संपुर्ण जगभर आहेच मात्र भारतीय टीव्ही इंडस्ट्रीमधल्या अभिनेत्रीसुद्धा कमी नाही. त्यादेखील सिनेअभिनेत्रींना तोडीसतोड आहेत. या टीव्ही अभिनेत्री त्यांच्या अभिनयाची चुणुक अशाप्रकारे दाखवतात कि त्यांना बॉलिवुडमध्ये काम करण्याची सहज संधी मिळते.

टीव्हीवरील काही अभिनेत्रींच्या अभिनयात अश्या प्रकारे जादु असते कि त्या सीन्स मध्ये रडण्याचा अभिनय जरी करत असल्या तरी काही वेळेस त्यांना रडताना पाहुन प्रेक्षकांना खरेखुरे रडु येते. पण मंडळी तुम्हाला माहित आहे का की या अभिनेत्री अभिनयातुन तुम्हाला भावनिक करुन स्वत: मात्र लाखो रुपये कमवतात.

सध्या टिव्ही इंडस्ट्रीमध्ये एकाहुन एक सरस अभिनेत्रींचा जलवा पाहण्यास मिळतो. पुर्वीच्या अभिनेत्री आणि आताच्या अभिनेत्री यांच्यात जमीन आसमानाची तफावत पाहण्यास मिळते. एवढेच नाही तर या टीव्ही अभिनेत्रींनी कमाईच्या बाबतीत सिनेअभिनेत्रींनासुद्धा मागे टाकले आहे. टिव्हीवरच्या प्रमुख अभिनेत्रींना बघितल्या शिवाय सर्वसामान्य महिलांना त्यांचा दिवस पुर्ण झाल्यासारखा वाटत नाही. मात्र या अभिनेत्रींना त्यांच्या कमाल अभिनयासाठी लाखो रुपये मिळतात.

1. दिव्यांका त्रिपाठी दाहिया – बनु मैं तेरी दुल्हन या मालिकेतुन करीयरची सुरुवात करणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दाहियाने अनेक रियालिटी शोमध्येसुद्धा भाग घेतला होतो. त्यानंतर तिला ‘ये है मोहबत्ते’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने तिचे आयुष्यच पालटुन गेले. या मालिकेमुळे ती घराघरात पोहचली. दिव्यांका त्रिपाठीने तिच्या अभिनयातुन प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ती एका दिवसासाठी ९० हजार ते १ लाख रुपये फि घेते. इंन्स्टाग्रामवरसुद्धा तिचे इतर अभिनेत्रींपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

2. जेनिफर विंगेट – दिल मिल गये, बेहद, बेपनाह, गंगा, सरस्वतीचंद्र यांसारख्या सुप्रसिद्ध मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा चर्चेत असते. जेनिफरने ज्या प्रकारे मेहतीने इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे स्थान पक्के केले आहे त्यामुळे तिचे कौतुक करु तितके कमी असे म्हणावे लागेल. जेनिफर एका दिवसाचे ७० ते ८० हजार रुपये फि घेते.

3. अनिता हसनंदानी – टिव्ही इंडस्ट्रीमध्ये कधी चांगली तर कधी खलनायिकी भुमिका साकारणारी अभिनेत्री अनीता हसनंदानी एकता कपूरची फेवरेट टीवी एक्ट्रेस आहे. अनिताने बॉलिवुडच्या काही चित्रपटांमध्येसुद्धा काम केले आहे. अनीता खुप सुंदर आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे. तिने नागिन-३ मालिकेत सुद्धा अभिनय केला आहे. यात तिने एका नागिनीची भुमिका साकारली होती. अनिता एका एपिसोडची ८० हजार रुपये फि घेते. याशिवाय तिने नच बलिये या रियालिटी शोमध्ये सुध्दा भाग घेतला होता. तिथे ती १ लाख रुपये चार्ज घ्यायची.

4. हिना खान – स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहेलाता है’ या मालिकेतुन करीयरची उत्कृष्ठ सुरुवात करणारी अभिनेत्री हिना खान हिची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात अख सोज्वळ मुलगी अशी होती. मात्र जसं तिने बिगबॉसच्या घरात प्रवेश केला तशी तिची सोज्वळ मुलीची प्रतिमा बदलण्यास वेळ लागला नाही. तिच्यातील खरी खलनायिका प्रेक्षकांसमोर आली.

बिग बॉसच्या त्या सिजनच्या शेवटच्या टप्प्यात ती बाद झाली मात्र बाहेर येऊन तिचे नशीब फळफळले कारण तिला एकता कपूरचा पॉप्युलर शो ‘कसौटी झिंदगी की’ मध्ये एक महत्वाची भुमिका साकारण्याची संधी मिळाली. हिनाची एका दिवसाची फि १.२५ लाख रुपये आहे. या महागड्या अभिनेत्री असल्यामुळे त्यांना त्या मालिकेत खुप कमी दाखवले गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *