अमिताभ बच्चन यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये ५२ वर्षे पुर्ण झाली आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती त्यांच्या चाहात्यांना दिली. पोस्ट शेअऱ करत त्यांनी लिहीले कि, आजच्याच दिवशी मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. १५ फेब्रुवारी १९६९… ५२ वर्ष… त्यांच्या या ट्विटला बॉलिवुडच्या अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. बॉलिवुडमध्ये ५२ वर्षे पुर्ण झाल्यावर बिगबींनी एकामोगमोग एक असे बरेच ट्विट केले.

१९६९ मध्ये करियरला सुरुवात करणाऱ्या अमिताभ यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीला त्यांना इंजीनियर किंवा एअरफोर्स मध्ये जाण्याची इच्छा होती. पण नशीबाने त्यांना हिंदी सिनेमांच्या पडद्यावरच झळकवले. आज आम्ही तुम्हाला बिगबींसंबधी एक खास गोष्ट सांगणार आहोत. तब्बल २२ चित्रपटांमध्ये अमिताभ यांचे नाव विजयच होते. यामागे सुद्धा एक खास कारण आहे जे कदाचित खुप कमी लोकांना ठावुक आहे.

अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्तानी या चित्रपटातून त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र त्यावेळी हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. या चित्रपटानंतर त्यांनी सलग १२ चित्रपट फ्लॉप दिले. पाठोपाठ एवढे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ते खुपच डगमगून गेले. त्यानंतर अचानक त्यांना प्रकाश मेहरा यांचा जंजीर हा चित्रपट ऑफर झाला. असे म्हटले जाते की या चित्रपटाला अनेक सुपरस्टार्सनी रिजेक्ट केले होते.

प्रकाश मेहरा यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले की, जंजीर चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ खूपच नर्वस असायचे. ते खूप खचलेले दिसायचे. शॉट झाल्यावर ते एकटेच बसून कोकोकोला पीत राहायचे. अमिताभ यांच्या आधी अनेक नामांकित कलाकारांनी जंजीर नाकारला होता. मात्र अमिताभ यांनी या चित्रपटात त्यांचे संपूर्ण कौशल्य पणाला लावले आणि याचा निकाल तुम्ही पाहू शकता. या चित्रपटात अमिताभ यांच्या पात्राचे नाव विजय असे होते.

अमिताभ बच्चन यांच्यावर पुस्तक लिहिलेली नामांकित लेखिका भावना सोमय्या यांनी एकदा सांगितलेले की, आपल्या इंडस्ट्रीची एक प्रथा आहे की ज्या नावाने कोणा फिल्म स्टार ची फिल्म यशस्वी होते तेव्हा त्याच्या पुढील चित्रपटात सुद्धा तेच नाव ठेवले जाते. मी हीच गोष्ट एकदा जावेद अख्तर यांना सुद्धा विचारली होती की ते प्रत्येक गोष्टीवर विजय कसे मिळवतात. कदाचित याच कारणामुळे त्यांचे नाव प्रत्येक चित्रपटांमध्ये विजय ठेवले गेले असावे.

अमिताभ यांना मिळालेल्या यशामुळे तब्बल २२ चित्रपटांमध्ये त्यांच्या पात्राचे नाव विजय असे ठेवले होते. जंजीर, रोटी कपडा और मकान, हेराफेरी, त्रिशूल, डॉन, द ग्रेट गॅ*म्ब*ल*र, काला पत्थर, दो और दो पांच, दोस्ताना, शान, शक्ती, आखरी रास्ता, अकेला, आखे, राण, शहेनशहा, अ*ग्नि*पथ चित्रपटांमध्ये त्यांचे नाव विजय असे होते.

१९६९ मध्ये अमिताभ यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात मृणाल सेन यांच्या बंगाली चित्रपटात आवाज देऊन केली होती. त्यांना सर्वात पहिले सुनील दत्त यांचा चित्रपट रेश्मा और शेर यासाठी साइन केले होते. त्यासाठी इंदिरा गांधी यांनी त्यांची मैत्रीण नर्गिस ला पत्र सुद्धा लिहिले होते. हा चित्रपट १९७१ मध्ये रिलीज झालेला. अमिताभ यांनी २०५ पेक्षा अधिक चित्रपटामध्ये काम केले आहे. यापैकी १२ चित्रपटांमध्ये त्यांनी डबल रोल केले होते. महान या चित्रपटात त्यांनी ट्रिपल रोल सुद्धा केला होता.

असे म्हटले जाते की महमूद यांना सात हिंदुस्तानी मधील अमिताभ यांचा अभिनय फार आवडला होता. त्यानंतर त्यांनी अमिताभ यांना तीन चित्रपटांमध्ये साईन केले. यासाठी त्यांनी अमिताभला पाच हजार ,सात हजार, दहा हजार रुपये दिले होते. अमिताभ यांनी चित्रपटात नशीब आजमावण्यापूर्वी कोलकत्याला रेडिओ अनाऊन्सर आणि एका शिपिंग कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले होते. त्याकाळी त्यांना ८०० रुपये सॅलरी मिळायची.

१९६८ ला कोलकत्ता मधील नोकरी सोडल्यावर ते मुंबईला आले. ७८ व्या वर्षी सुध्दा अमिताभ चित्रपटांमध्ये खूप ॲक्टिव आहेत. झुं*ड, चेहरे, ब्र*ह्मा*स्त्र, तेरा यार हू मे, आँखे २, मई डे हे त्यांचे येणारे चित्रपट आहे. सध्या अमिताभ अजय देवगन च्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या मई डे या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *