रात्री झोपेत काही वेळेस आपल्याला खूप मोठा आवाज ऐकू येतो. तो आवाज सतत कानावर पडत असल्यामुळे काही वेळेस आपली झोप मोड होते. आधी आपल्याला ते स्वप्न आहे असे वाटते. नंतर ते स्वप्न नाही हे कळल्यावर आपल्याला शेजार्‍यांकडे काहीतरी झाले आहे असा समज होतो.

पण नंतर जेव्हा झोप मोडते आणि आपण शेजारी पाहतो तेव्हा आपल्याला समजते की हा आवाज आपल्या बाजूला झोपणाऱ्या व्यक्तीच्या नाकातून येत आहे म्हणजे त्यांच्या घोरण्याचा आवाज येत आहे. त्या आवाजामुळे तुमची झोप उडून जाते. तुमची झोप जर रोज याच कारणामुळे उडत असेल तर तुम्हाला नक्कीच काहीतरी केले पाहिजे.

कारण दिवसभराच्या थकव्याने आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या शरीराला आणि मनाला आरामाची गरज असते. मात्र बाजूला झोपणाऱ्या व्यक्तीच्या घोरण्यामुळे ती झोप जर आपल्याला मिळत नसेल तर आपल्या देखील आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. झोप न मिळाल्यास आपले डोके दुखते. चिडचिड होते तसेच कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. त्यामुळे यासाठी आपल्यालाच काहीतरी उपाय करावा लागेल कारण घोरणारी व्यक्ती ही गाढ झोपेत असते. त्याला त्याच्या घोरण्याचा आवाज येत नाही. त्यामुळे त्याची झोप पूर्ण होते.

घोरण्या पासून मुक्तता मिळवण्यासाठी हे आहेत रामबाण उपाय – तुम्ही जर या समस्येने ग्रस्त आहात तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामधून वेलची किंवा वेलची पूड टाकून ते पाणी प्यावे. यामुळे तुमच्या घोरण्याची समस्या दूर होईल.
याशिवाय असेही म्हटले जाते की मधाचा छोटासा वापर देखील तुमची ही मोठी समस्या दूर करू शकते.

यामुळे केवळ तुम्ही घोरण्याच्या समस्येपासून मुक्त व्हाल सोबतच तुमचे आरोग्य देखील सुदृढ राहील. यासाठी एक कप कोमट पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी हे पाणी प्या. असे केल्यास तुमची घोरण्याच्या समस्येतून सुटका होईल.

हळद अनेक रोगांसाठी रामबाण उपाय मानला जातो. रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी हळद घातलेले दुध प्यायल्यास घोरण्याची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त जर तुम्ही झोपण्यापूर्वी पाण्यात पुदिन्याच्या तेलाचे काही थेंब घालून त्याच्या गुळण्या केल्यास तुमच्या नाकातील सूज कमी होईल आणि तुम्हाला श्वास घ्यायला अडचण येणार नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही झोपण्यापूर्वी पुदिन्याचे तेल लावून सुद्धा झोपू शकता यामुळे तुमची घोरण्यापासून सुटका होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *