बॉलिवुडला अनेक परिवारांचा वारसा लाभला आहे. त्यातल्या बच्चन कुटुंबाशिवाय बॉलिवुड अधुरे आहे असे म्हटल्यास हरकत नाही. या परिवारातील बहुतेक सदस्यांनी हि्ंदी सिनेसृष्टीत त्यांच्या अभिनयाची जादु दाखवली आहे. या परिवारातील प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. मात्र या कुटुंबाची लाडकी लेक श्वेता नंदा ही अभिनय क्षेत्रापासुन दुर राहणे पसंत केले.

परंतु असे असुन देखील ती बरेचदा लाईमलाइटमध्ये असते. श्वेताचे लग्न दिल्लीचे बिझनेसमन निखिल नंदा सोबत झाले तर अभिषेक बच्चनने जगातील सर्वाच सुंदर महिलांपैकी एक असणाऱ्या ऐश्वर्या राय सोबत लग्न केले. बच्चन परिवाराला अनेकदा एकाच छताखाली आनंद साजरा करताना पाहिले गेले आहे.

तसे पाहायला गेले तर या परिवारातील प्रत्येक सदस्य एकमेकांवर खुप प्रेम करतो मात्र तरीही ऐश्वर्या राय व तिची नंणद श्वेता नंदा यांचे नाते कसे आहे याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यासोबतच अमिताभ यांच्या संपत्तीबद्दल सुद्धा सांगणार आहोत.

कुटुंबाची लाडकी सून – अभिनय क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी ऐश्वर्या राय ही बच्चन कुटुंबाची लाडकी सून आहे. तर श्वेता संपुर्ण कुटुंबाची लाडकी मुलगी आहे. तिच्या लग्नानंतर सुद्धा बच्चन परिवार तिच्यावर खुप प्रेम करतो. ऐश्वर्याचे सुद्धा तिच्या नंणदेवर खुप प्रेम आहे. या दोघांचे खुप चांगले नाते आहे. मात्र तरीही सोशल मीडियामुळे लोकांना या दोघींचे नक्की नाते कसे आहे हे समजत नाही. मात्र प्रत्यक्षात या दोघी सोशल मीडियापासुन खुप दूर असतात. त्या पार्टी आणि इव्हेंट्समध्ये बऱ्यादा एकत्र दिसतात.

अमिताभ यांनी संपत्तीचे केले दोन भाग – अमिताभ यांच्याकडे भरपूर संपत्ती आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे ते त्यांची संपत्ती कोणाच्या नावावर करणार यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात. काहींचे म्हणणे आहे कि बिग बी त्यांची संपत्ती त्यांच्या मुलाच्याच नावावर करतील. मात्र काही दिवसांनी स्वत: अमिताभ यांनीच सांगितले होते की त्यांच्या संपुर्ण संपत्तीचा मालक हा केवळ अभिषेक नसणार तर त्यात श्वेतासुद्धा बरोबरीची वारसदार असणार आहे.

मीडिया रिपोर्टस् नुसार अमिताभ बच्चन यांच्याकडे २८०० करोड रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीची दोन भागात विभागणी केल्यास श्वेताकडे १४०० करोड रुपये व अभिषेक कडे १४०० रुपये जातील. अमिताभ यांनी संपत्तीच्या वाटणीवरुन घेतलेल्या निर्णयावरुन हे सिद्ध होते की ते मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करत नाही. त्यांच्यासाठी दोघेही समान आहेत.

नंणदेला ऐश्वर्याची ही सवय आवडत नाही – एका टॉक शो दरम्यान श्वेता नंदाने तिच्या वहिनी बाबत काही गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये तिने तिच्या वहिनीच्या वाईट सवयीसुद्धा सांगितल्या. श्वेताने सांगितले कि ऐश्वर्याचे वेळेचे नियोजन चांगले नसुन ती वेळेत कधील कॉल बॅकस करत नाही. मात्र श्वेताचे ऐश्वर्यावर खुप प्रेम आहे.

या शोमध्ये श्वेताने तिची भाची आराध्याबद्दल सुद्धा सांगितले. श्वेता म्हणाली कि आराध्या तिच्या वयाच्या मानाने खुपच समजूतदार आहे. या शोमध्ये अभिषेकलासुद्धा विचारले गेले होते कि तो जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात कोणाला जास्त घाबरतो. यावर अभिषेकने सांगितले कि त्याचे त्याच्या पत्नीवर खुप प्रेम आहे. मात्र त्याला ऐश्वर्याची पॅकिंग स्किल बिलकुल आवडत नाही.

अभिषेक कोणाला घाबरतो या प्रश्नावर श्वेताने सांगितले कि, अभिषेक आईपेक्षा त्याची पत्नी ऐश्वर्याला खुप घाबरतो. श्वेताच्या उत्तरावर तेथील प्रेक्षक खुप हसु लागले होते. श्नेता नंदा लग्नानंतर सुद्धा अनेकदा सणसुदीला माहेरीच सेलिब्रेशन करताना दिसते. चाहात्यांना बच्चन कुटुंबाची बॉंण्डींग खुप आवडते. बच्चन कुटुंब त्यांचे वयक्तिक आयुष्य सोशल मीडियापासुन दूर ठेवते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *