जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आणि बॉलिवुड अभिनेता टायगर श्रॉफने नुकताच त्याचा ३१ वा वाढदिवस साजरा केला. टायगरचा जन्म १९९० मध्ये झाला होता. टायगरचे खरे नाव त्यावेळी जय हेमंत श्रॉफ असे ठेवले होते मात्र नंतर त्याच्या वडिलांनी म्हणजेच जॅकी श्रॉफने त्याचे नाव बदलुन टायगर असे ठेवले. स्वत: जॅकी यांनी यामागचे कारण सांगितले.

टायगरच्या नावाबद्दल सांगताना जॅकी यांनी सांगितले कि जेव्हा टायगर लहान होता त्यावेळी त्याच्या नखांनी जॅकी यांचा चेहरा बोचकारायचा. त्यांचे डोळे बाहेर काढायचा प्रयत्न करायचा. त्याला डोळे खावेसे वाटायचे. जॅकी यांनी सांगितले कि टायगर जेव्हा डोळे पाहायचा तेव्हा त्याला ती खाण्याची गोष्ट वाटायची. त्यामुळे तो डोळ्यांवर तुटुन पडायचा. त्यावेळी तो केवळ एक-दोन वर्षांचा असेल. त्याची ही चावायची आणि बोचकरायच्या सवयींमुळे त्याच्यासाठी टायगर हे नाव योग्य होते.

टायगरच्या वाढदिवसानिमित्त जॅकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली की, टायगरने कमी वयातच त्याची स्वत:ची ओळख निर्माण केली. सध्या मी टायगरच्या नावाने ओळखला जातो ही गोष्ट मला खुप आवडते. त्याचे नाव होत आहे ही खुप चांगली गोष्ट आहे.

माझेही या इंडस्ट्रीमध्ये नाव होते मात्र तरी टायगरने ते आणखी रोशन केले आहे. त्याला इंडस्ट्रीमध्ये येऊन खुप कमी वेळ झाला आहे तरी तो खुप मेहनतीने काम करत आहे. जॅकी यांनी त्यांच्या मुलाला -7 डिग्रीमध्ये सुद्धा काम करताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांना त्याचा आणखी अभिमान वाटतो.

टायगरने एकदा सांगितलेले की तो जर अभिनेता झाला नसता तर एक फुटबॉलर असता. शाळेत असताना टायगर खुप वेगात धावायचा. मुलांना मारल्यामुळे सुद्धा टायगरच्या तक्रारी घरी यायच्या. इंडस्ट्रीमध्ये जेव्हा टायगरची एंट्री झाली तेव्हा त्याला सगळे करीना कपूरच्या नावाने ओळखायचे. कारण लोकांचे म्हणणे होते की तो लेडी करीना कपूर वाटतो.

यावर टायगरने उत्तर दिले की, जेव्हा त्याच्या चेहऱा आणि करीना कपूरचा चेहऱ्याबद्दल कोणी गॉसिप करत त्यावेळी त्याला बिलकुल वाईट वाटत नाही. उलट त्याला ते खुप आवडतं. निदान त्या निमित्ताने लोक त्याचे नावं तरी घेतात. त्यामुळे त्याची पब्लिसिटी होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *