आपल्या देशात बॅंकांप्रमाणेच पोस्टात सुद्धा अनेक बचत योजना असतात. या योजनांमुळे लोकांना पैशांची बचत करणे सोप्पे जाते. पोस्टातील योजना या सरकार द्ववारे राबवल्या जातात त्यामुळे लोकांचे पैसे सुद्धा सुरक्षित राहतात. जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने पोस्टातील बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याज दरांचे समिक्षण केले. सरकारद्वारे राबवण्यात येणाऱ्या नवनवीन व्याजदरांनुसार पोस्टातील अनेक योजनांमध्ये गुंतवणुक केल्यावर गुंतवणुकदरांना त्याबदल्यात चांगली मिळकत मिळते. चला तर जाणुन घेऊ पोस्टातील कोणत्या योजनांवर किती व्याज दर मिळतो.

पोस्टातील बचत योजनांचे उद्देश काय – लोकांमध्ये बचतीची भावना निर्माण करणे हे पोस्टातील बचत योजनांचे मुख्य उद्देश्य असते. यासाठी सरकारने बचत योजनेत गुंतवणुक करणाऱ्या गुंतवणुकदारांना उच्च व्ययाज दरासोबतच करामध्ये देखील सुट दिली आहे. या स्किममुळे गुंतवणुकदार आर्थिकदृष्ट्यादेखील सक्षम बनेल. पोस्टात बचतीच्या अनेक योजना आहेत. या योजना सर्व वर्गातील लोकांचा विचाक करुन तयार केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गातील लोकांना कोणती ना कोणती स्किम देण्यात आली आहे. ज्यामुळे लोक मोठ्या संख्येने पोस्टातील स्किम मध्ये पैशांची सेव्हिंग करतील.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम – पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीममध्ये गुंतवणुक करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यकाळाचा वेळ दिलेला असतो. या स्किम मध्ये कमीतकमी २०० रुपयांची गुंतवणुक करता येते. तसेच या स्किममध्ये उघडलेले खाते दुसऱ्याला सुद्धा ट्रान्सफर करता येते. या खात्याला चार कार्यकाळात विभागले जाते. जर तुम्ही एका वर्षाचे डिपोजिट करत असाल तर त्यावर ५.५ टक्के व्याजदर आकारण्यात आला आहे. पण जर तुम्ही ५ वर्षांसाठी डिपोजिट करता तर ६.७ टक्के व्याजदर मिळेल.

सुकन्या समृद्धि योजना – ही योजना खास मुलींसाठी तयार केली गेली आहे. या योजनेअंतर्गत ७.६ टक्के व्याज दर निर्धारित केला गेला आहे. या योजनेत कमीतकमी १००० रुपये तर जास्तीतजास्त १,५०,००० रुपयांची गुंतवणुक करता येते.

नेशनल सेविंग सर्टिफिकेट – या योजनेत गुंतवणुक करण्यासाठी ५ वर्षांचा मॅच्युरिटी पिरीएड निर्धारित केला आहे. या योजनेतील गुंतवणुकदारांसाठी ६.८ टक्के व्याज दर आकारण्यात आला आहे. या योजनेत कमीतकमी १०० रुपयांपासुन ते जास्तीजास्त कितीही रक्कम गुंतवता येते.

पब्लिक प्रोविडेंट फंड – पब्लिक प्रोविडेंट फंड ही एक १५ वर्षांची लॉंग टर्म गुंतवणुक योजना आहे. या योजनेअंतर्गत ७.१ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत कमीतकमी ५०० रुपयांपासुन ते जास्तीत जास्त १५०००० रक्कम गुंतवता येते.

सीनियर सिटीजन सेविंग स्कीम – ही योजना ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत ७.४ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत जास्तीजास्त १५०००० रक्कम गुंतवता येते.

किसान विकास पत्र – ही योजना देशातील शेतकरी बांधवांसाठी आहे. यात कोणीही व्यक्ती गुंतवणुक करु शकतो. या योजनेअंतर्गत ६.९टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. ९ वर्षे ४ महिन्यांचा या योजनेचा कार्यकाळ असतो. या योजनेत कमीतकमी १००० रुपयांपासुन ते जास्तीजास्त कितीही रक्कम गुंतवता येते.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट – हि एक मासिक गुंतवणुक योजना आहे. ही योजना ५ वर्षांसाठी असते. या योजनेत गुंतवणुकदारास दर महिना पैसे भरावे लागतील. या योजनेअंतर्गत ६.९टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेत कमीतकमी १० रुपयांपासुन ते जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम – या योजनेअंतर्गत गुंतवणुकदारास दरमहिना त्यांच्या गुंतवणुकीवर एक ठराविक रक्कम मिळते. या योजनेत कमीतकमी १५०० रुपयांपासुन ते जास्तीजास्त ४.५ लाख रुपये सिलिंग होल्डिंग तथा ९००००० रुपये जॉइंट अकाउंटसाठी गुंतवता येतात. या योजनेअंतर्गत ६.६ टक्के व्याजदर निर्धारित केला आहे. या योजनेचा मॅच्युरिटी पिरिएड ५ वर्षांचा ठेवला आहे.

पोस्टात बचत योजनेची पात्रता – पोस्टात बचत योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी भारताचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. 1. आधार कार्ड 2. पैन कार्ड 3. पासपोर्ट साइज फोटोग्राफ 4. मोबाइल नंबर 5. निवासी प्रमाणपत्र

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *