अनेक विविध चित्रपटांमध्ये भूमिका करत प्रेक्षकांची आवडती ठरलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या काही आवडत्या कलाकारांचे नवे चित्रपट आपल्याला पाहता आले नाहीत. अद्याप देखील कोरोनाचे संकट आपल्यावर घोघावत असल्याने सर्वच गोष्टी फार काळजीपूर्वक पार पाडल्या जात आहेत.

येत्या ४ जूनला रणवीर सिंग आणि दीपिकाचा “८३” हा १९८३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपवर आधारित असलेला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीरने कपिल देव यांची तर दीपिकाने रोमी भाटिया म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. चित्रपटामध्ये भूमिका साकारत इतर निर्मात्यांसोबत दीपिका देखील या चित्रपटाची निर्माती आहे. कबीर खान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

प्रसिद्ध धूम चित्रपटाचा पुढचा सिक्वेल म्हणजेच धूम ४ साठी चित्रपट निर्मात्यांची रेलचेल सुरु झाली आहे. या चित्रपटात ते नकारात्मक भूमिकेसाठी स्त्री पात्र निश्चित करीत आहेत आणि या नकारात्मक स्त्री पात्रासाठी दीपिकेला वृत्त समोर आले आहे. तर दीपिका देखील हे नवे आव्हान स्वीकारण्यासाठी तितकीच उत्साही आहे. या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्याआधी ती तिच्या शूटिंगच्या तारखा निवडणार आहे.

धूम ४ मध्ये निश्चित कलाकार घेण्याऐवजी चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये जॉन अब्राहम, दुसऱ्या भागामध्ये ह्रितिक रोशन तर अमीर खान हा या चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये असेल, तर या कलाकारांसमवेत नकारात्मक स्त्री पात्र पाहताना फार मजा येणार आहे हे नक्की. यानंतर पठाण, फायटर, महाभारत अशा अनेक आगामी चित्रपटांमध्ये दीपिकाला काम करताना पाहणार आहोत.

काही दिवसांपूर्वी एरपोर्टवर दीपिकाला पहिले असता तिच्या हातातील मोबाईल स्क्रीनवरील वॉलपेपर दिसले होते. या वॉलपेपर वर रणवीर सिंगसोबतचा फोटो नसून या वॉलपेपरवर तिची बहीण अनिशा पदुकोण व तिचा लहानपणीचा फोटो होता. या येत्या नव वर्षात दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट डिलीट करून तिचा ऑडिओ व काही व्हिज्युअल्स असलेली पोस्टमय ऑडिओ डायरी असं टाकत १ जानेवारीला ती पोस्ट तिने शेयर केली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *