टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसेने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शार्दुल व्यास सोबत लग्न केले. शार्दुल हा घ*ट*स्फो*टी*त असुन त्याचे आधी दोन लग्न झाली आहेत. आधीच्या दोन लग्नांमधुन त्याला एक मुलगा आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन नेहा पेंडसेला ट्रोल करण्यात येत आहे. अशातच या ट्रोलींगला नेहा पेंडसेने सडेतोड उत्तर दिले आहे.

नेहा ने सांगितले कि ती आता या ट्रोल्सला इग्नोर करायला शिकली आहे. नेहाने सांगितले कि सततच्या या ट्रोलिंगमुळे सुरुवातीला तिचे पती खुप कंटाळायचे. त्यांना या सर्व गोष्टींची सवय नव्हती पण कालांतराने ते हळुहळु सर्व शिकले. आता होणाऱ्या ट्रोलिंगचा त्यांच्यावर कोणताच परिणाम होत नाही.

नेहाने तिला इंडस्ट्रीमध्ये कराव्या लागलेल्या सामन्यांबद्दलसुद्धा माहिती दिली. तिला एक महिला असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागले होते. नेहाने सांगितले कि एक महिला म्हणुन जर तुम्ही कामाच्या ठिकाणी कमजोर पडलात तर लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. लोक जेव्हा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण आणखी मजबुत होतो असे नेहा सांगते.

नेहा सध्या ‘भाभीजी घर पर है’ या लोकप्रिय कार्यक्रमात सौम्या टंडनच्या जागी काम करत आहे. नेहा साकारत असलेली अनिता भाभी प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस पडत आहे. नेहा बद्दल सांगायचे झाल्यास तिचा जन्म २९ नोव्हेंबर १९८४ ला झाला होता. झी मराठीच्या भाग्यलक्ष्मी कार्यक्रमातुन तिने तिच्या मराठी क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

नेहाने मराठीसोबतच तमिळ, तेलगु, मल्याळम, आणि हिंदी या भाषांमध्ये सुद्धा काम केले आहे. यात तिने काही ठिकाणी अभिनय तर काही ठिकाणी डान्स परफोर्म केले. नेहा ५ जानेवारी २०२० रोजी शार्दुल सिंह व्याससोबत विवाहबंधनात अडकली. नेहाने आतापर्यंत हसरते, मीठी मीठी बाते, भाग्यलक्ष्मी, मे आय कम इन मॅडम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *