साऊथमधील सर्व कलाकार व चित्रपट नेहमीच फार हिट असतात. साउथचे चित्रपट बॉलिवूडच्या तोडीस तोड असतात. याच एक उत्तम उदाहरण म्हणजे बाहुबली! साऊथमधील अभिनेत्री, अभिनेते, चित्रपटांच्या कथा, त्यांचे सेट्स सर्वच गोष्टी खूप हिट असतात. इतकंच नव्हे तर अशी काही गाणी सुद्धा साऊथमधील आहेत जी फार फेमस झाली आहेत.

साऊथमधील असे एक अभिनेते आहेत, बॉलिवूडमधील बिग बी अमिताभ बच्चन देखील त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. मोहनलाल असं या अभिनेत्याचं नाव आहे. मोहनलाल हे साऊथ सोबतच बॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध आहेत. मोहनलाल यांना साऊथ चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार देखील म्हटले जाते.

जेव्हा अन्य भाषांमध्ये सिनेमामधून सॉफ्ट पॉ*र्न सारख्या गोष्टी प्रदराशीत केल्या जात होत्या तेव्हा मोहनलाल यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळेस मल्याळी भाषेतील चित्रपटांना प्रेक्षकांना खूप चांगला कंटेन्ट देण्यास सुरुवात केली होती. मोहनलाल यांनी कौटुंबिक चित्रपट तयार करण्यास सुरुवात केली आणि हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरले.

मोहनलाल यांची प्रसिद्धी इतकी वाढली की १९८२ ते १९८८ या काळात दार १५ दिवसांनी मोहनलाल यांचे चित्रपट प्रदर्शित होत असतं. १९८६ मध्ये तर मोहनलाल यांचे एकूण ३५ चित्रपट रिलीज झाले. मोहनलाल यांनी आतापर्यंत एकूण ३३० चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेते होण्या आधी मोहनलाल हे एक प्रोफेशनल रेसलर होते आणि याच कारणामुळे चित्रपटातील ऍक्शन सिक्वेन्स ते अगदी सहजपणे पूर्ण करत असतं.

अभिनयासोबतच मोहनलाल हे ताइक्वांडोमध्ये देखील पारंगत होते. २०१२ साली वर्ल्ड ताइक्वांडो हेडक्वाटरतर्फे मोहनलाल याना ब्लॅक बेल्टने सन्मानित केले गेले. साऊथमधील हे पहिले अभिनेते आहेत ज्यांना हा मान मिळाला आहे. मोहनलाल यांच्या व्यतिरिक्त शाहरुख खान आणि मिझोरमचे मुख्यमंत्री लल थनहवला यांना हा मान मिळाला आहे. ताइक्वांडो आणि अभिनयासोबतच मोहनलाल यांना संगीतामध्ये देखील रुची होती. यामूळेच २०१४ मध्ये त्यांनी ‘Lalisom – The Lal Effect’ नावाचा एक बँड तयार केला.

मोहनलाल हे सुपरस्टार आहेत व सोबतच त्यांना अभिनयाचा अनुभव देखील असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्यासाठीचे त्यांचे मानधन देखील जास्त आहे. मोहनलाल यांची वर्षभराची कामे २२० करोड इतकी आहे. मोहनलाल एका चित्रपटासाठी ३ करोड इतके मानधन स्वीकारतात. या व्यतिरिक्त त्यांची एंडोर्समेंट फीस ५० लाख इतकी आहे.

इतर विविध उद्योगधंद्यांमध्ये त्यांची ८० करोड इतकी गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे तब्बल ८ करोडच्या ६ कार आहेत. त्यांच्या ताफ्यात मर्सडीज बेंज, BMW, जॅग्वार आणि रेंज रोव्हर या कार्सचा समावेश आहे. याशिवाय मोहनलाल हे चित्रपट निर्मिती व रेस्त्रां यामध्ये देखील गुंतवणूक करतात.

मोहनलाल हे साऊथमधील एकमेव असे सुपरस्टार आहेत ज्यांचा दुबईमधील प्रसिद्ध व सर्वात उंच इमारत बूर्जखलिफामध्ये फ्लॅट आहे. या इमारतीच्या २९ व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. मोहनलाल यांच्या व्यतिरिक्त फक्त बॉलिवूडमधील शिल्पा शेट्टीचा फ्लॅट बूर्जखलिफामध्ये आहे. वयाच्या ५९ वर्षी देखील मोहनलाल हे चित्रपटातील नायकाची मुख्य भूमिका साकारताना दिसतात. मोहनलाल यांच्या लोकप्रियतेपुढे बॉलिवूडमधील अनेक यशस्वी कलाकारांची लोकप्रियता देखील कमी पडते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *