कोणतेही वडिल त्यांच्या लेकीसाठी किती पझेसिव्ह असतात हे वेगळे सांगायला नको. प्रत्येक बाप त्याच्या लेकीला त्याच्या त्यांच्या परिने तळा हातावरील फोडाप्रमाणे जपत असतो. मग तो बाप सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कोणी मोठा सुपरस्टार. बॉलिवुडचा बादशहा शाहारुख खानसुद्धा त्याच्या लेकीसाठी खुप पझेसिव्ह आहे.

तो नेहमीच त्याची मुलगी सुहाना खानसाठी प्रोटेक्टीव्ह आहे हे त्याच्या कृतीतुन दाखवत असतो. सध्या शाहारुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात शाहारुख त्याच्या मुलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ करण जोहरचा शो कॉफी विथ करण या शोमधील असुन त्यावेळी शाहारुख या शो मध्ये आलिया भट्टसोबत गेला होता.

या शोमध्ये करणने शाहारुखला सुहानाच्या फर्स्ट किस बद्दल विचारले. करणने म्हटले कि, तुझी मुलगी १६ वर्षांची झाली आहे. तर तुझ्या मुलीला जो फर्स्ट किस करेल त्याला मारशील का ? शाहारुखने या प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले कि मी त्या व्यक्तीचे ओठ कापुन टाकीन. शाहारुखचा हा जुना व्हिडीओ असुन तो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

नुकतच सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती तिच्या दोन मित्रांसोबत दिसते. मात्र या फोटोमध्ये जास्त चर्चा ही सुहानासोबत दिसत असलेल्या मुलाची होत आहे. सुहाना ज्या प्रकारे त्या मुलासोबत पोज देत आहे त्यावरुन तो मुलगा आहे तरी कोण याची सर्वाना उत्सुकता लागली आहे. याशिवाय सुहानचा अनोखा अंदाज तिच्या चाहात्यांना खुप आवडला आहे. या फोटोत सुहाने ब्लु क्रॉप टॉप आणि ब्लु पॅंट घातली आहे. यामध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.

सुहाना सध्या तिच्या शिक्षणासाठी न्युयॉर्कमध्ये राहत आहे. ती तिच्या सोशल मीडिया अंकाउंटवरुन नेहमीच तिच्याबद्दलची माहिती देत असते. काही दिवसांपुर्वीच ती तिचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी तिथे गेली आहे. शाहारुख खान आणि अबराम तिला सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *