तुम्हाला जर बिझनेस करण्याची इच्छा असेल तर तुम्ही भारतीय रेल्वेसोबत मिळुन कमाई करु शकता. यासाठी तुम्ही कमी पैशांत सुद्धा जास्त नफा देणारा बिझनेस करु शकता. आत्ननिर्भर भारत मोहिमेअंतर्गत भारतीय रेल्वेने सुक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योगांना सहभागी करुन घेण्याची संधी दिली आहे. तुम्हाला पण जर बिझनेस करायचा असेल तर तुमच्याकडे सुद्धा ही चांगली संधी आहे. यामध्ये तुमची चांगली कमाई होईल.

रेल्वेला प्रोडक्ट विकुन करा कमाई – रेल्वे दरवर्षी ७०,००० करोड रुपयांहुन अधिक प्रोडक्ट खरेदी करते. यामध्ये टेक्निकल आणि इंजिनियरिंग प्रोडक्टस् सोबतच रोजच्या वापरात येणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्टस सुद्धा सहभागी असतात. यामध्ये तुम्ही सुद्धा एक छोटा व्यवसायिक बनुन तुमचे प्रोडक्ट विकु शकता. तुम्ही जर रेल्वेसोबत बिझनेस करु इच्छित असाल तर https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वर रजिस्ट्रेशन करु शकता.

कसा सुरु करता येईल बिझनेस – मार्केट मध्ये सर्वात स्वस्त दरात सामान सप्लाय करणाऱ्यांकडुन रेल्वे प्रोडक्ट खरेदी करते. त्यामुळे तुम्हाला असा एखादा प्रोडक्ट सिलेक्ट करावा लागेल जो कोणत्याही कंपनीतुन स्वस्तात खरेदी कराता येईल. यानंतर तुम्ही एक डिजिटल सिग्नेचर तयार करा. त्याच्या मदतीने तुम्ही रेल्वेच्या https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in वेबसाइटवर जाऊन नवीन टेंडर टाकू शकता.

टेंडर टाकतेवेळी तुमचा खर्च व होणारा नफा यांची काळजी घ्या – लक्षात ठेवा तुमचे रेट जर कॉम्पेटेटीव्ह असतील तर तुम्हाला सहज टेंडर मिळतील. सर्विस सप्लायसाठी रेल्वे काही टेक्निकल योग्यता मागते. याव्यतिरिक्त रेल्वेने एमएसएमईला चालना देण्यासाठी एक मोठी निर्णय घेतला आहे. कोणत्याही रेल्वे निविदा खर्चाच्या २५ टक्के खर्चाच्या खरेदीत एमएसएमई १५ टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. याशिवाय छोट्या उद्योगांना सुरक्षा ठेव आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधूनही सूट देण्यात आली आहे.

पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही – जर तुम्ही आधीपासुन रजिस्ट्रेशन करुन ठेवले असेल किंवा रेल्वेच्या दुसऱ्या एखाद्या एजंसीमध्ये प्रोडक्ट सप्लाय करण्यासाठी रजिस्ट्रेशन करुन ठेवले असेल तर तुम्हाला पुन्हा रजिस्टर करावे लागणार नाही. एकाच रजिस्टर केल्यावर तुम्ही तुमचा बिझनेस सुरु करु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *