देवाने माणसाला सद्सद विवेक बुद्धी यांसारखे गुण देऊन इतर प्राणी वर्गापासुन वेगळे आणि हुशार बनवले. पण माणसाने याच हुशारीचा प्रयोग खोटे बोलणे यांसारख्या वाईट कामात सुद्धा करत आहे. आजच्या काळात माणुस आपापल्या सोयीनुसार सर्रास खोटं बोलतो. काही माणसं तर चतुराईने इतक सफाईदार खोटं बोलतात कि लोकांना त्याचं खोटंसुद्धा खऱ्याप्रमाणे वाटतं. पण थोडी चतुराई तुम्हीपण दाखवलात तर तुम्ही या खोट्याच्या जाळ्यात अडकण्यापासुन वाचाल. आज आम्ही तुम्हाला अशा काही व्यावहारिक गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्यांची काळजी घेऊन तुम्ही समोरच्याचे खोटे अगदी सहज पकडु शकता.

डोळे सांगतात सगळे – जर तुम्हाला कोणी व्यक्ती खोटं बोलत आहे असा संशय येत असेल तर सर्व प्रथम त्याचे डोळे नीट पहा. कारण तोंड काहीवेळेस खोटे बोलु शकतो पण डोळे कधीच खोटे बोलत नाही. साधारणपणे खोट बोलणारे लोक डोळ्यात डोळे घालुन बोलण्याची हिंमत करत नाही. किंवा काही वेळेस जरा जास्तच आय कॉण्टेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. जर एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यात बघुन एखादी गोष्ट सांगण्यास तयार नसेल तर समजुन जा कि ती व्यक्ती खोटं बोलत आहे.

खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला त्याच्या बॉडी लॅन्गवेज् वरुन ओळखा – समोरची व्यक्ती खरं बोलत आहे कि खोटं हे त्याच्या हावभावावरुन ओळखता येते. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी इमानदार नसेल तर त्याच्या बॉडी लॅन्गवेजमध्ये एक वेगळीच असहजता दिसुन येईल. खोटं बोलते वेळी काही लोकांच्या पापण्याची जोरात फडफड होत असते, त्याची स्माइल कमी होते. काही वेळेस ती व्यक्ती हाताची घडी घालुन बोलु लागतो.

बोलण्याच्या पद्धतीवरुन समोरील व्यक्तीचे खरेखोटे समजते – बोलतेवेळी त्या समोरील व्यक्तीच्या टोनवरुन किंवा पद्धतीवरुन तो माणुस खरे बोलत आहे कि खोटे हे समजते. साधारण पणे खोटे बोलते वेळी काही लोक कचरतात. तसेच खोटं बोलणारे व्यक्ती अनेकदा समोरच्या व्यक्तीच्या शब्दांचा वापर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना करतात.

राग खोटे समोरं आणतो – खोटं बोलणाऱ्या व्यक्ती काहीवेळेस खुप आक्रमक होतो. स्वत:चे खोटे खरे साध्य करण्यासाठी त्वरीत आक्रमक होतात. खरेतर खोटं बोलणारी व्यक्ती ही लगेच रक्षात्मक मुद्रेत येऊन निर्दोष व्यक्तीशी वाद घालण्यास सुरुवात करतो. त्याच्यावर उलटे फिरुन आक्रमक होतो.

मुद्द्यांवरुन भरकटवण्याचा प्रयत्न करतात खोटे बोलणारे व्यक्ती – खोटं बोलणारे व्यक्ती बऱ्याचदा समोरच्याचे लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा ते व्यक्ती मुख्य मुद्दावरुन दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या व्यक्तींना खरे बोलायचे नसते त्या व्यक्ती उगीच फाल्तु पॉइंटस् वर फोकस करण्याचा प्रयत्न करतात.

बोलण्याचा टॉपिक बदलुन खोटे पकडता येते – समोरच्या व्यक्तीचे खोटे पकडण्यासाठी तुम्ही एक ट्रिक करु शकता. जर तुम्हाला एखादी व्यक्ती खोटे बोलत आहे असे वाटत असेल तर बोलण्याचा टॉपिक लगेच बदलुन टाका. असे केल्यास खोट बोलणारा व्यक्ती मनातल्या मनात खुष होतो हे त्याच्या बोलण्यावरुन किंवा हावभावावरुन दिसुन येते. मात्र खरे बोलणारा व्यक्ती अचानक टॉपिक बदलल्यामुळे कन्फ्युज होतो आणि तुमच्या टॉपिक बदलण्याच्या निर्णयाला विरोध करतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *