बायकोसमोर कोणत्याही सुंदर मुलीवर लाईन मारणे कोणत्याही विवाहीत पुरुषाला भारी पडु शकते. मग तो विवाहित पुरुष हा कोणी सर्वसामान्य व्यक्ती असो वा कोणी मोठा बॉलिवुड स्टार. असाच एक किस्सा बॉलिवुड अभिनेता रितेश देशमुखसोबत घडला. पत्नी जेनेलिया समोर अभिनेत्री प्रिती झिंटा सोबत फ्लर्ट करणे त्याला महागात पडले आहे. त्यामुळे त्याची जेनेलिया कडुन चांगलीच धुलाई झाली. घाबरु नका… हे काही सत्यात नाही तर एका फनी व्हिडीओ मध्ये झाले आहे.

सोशल मीडियावर भरपुर अॅक्टीव्ह राहणाऱ्या जेनेलियाने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश एका अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर प्रिटी झिंटाशी हसत खेळत बोलत आहे. तिच्या हातावर किस करत आहे. त्याचवेळी त्याच्या शेजारीच उभ्या असलेल्या जेनेलियाला मात्र रितेश इग्नोर करत असतो. त्यामुळे घरी पोहचल्यावर जेनेलिया रितेशचे काय हाल करते ते या व्हिडीओ दाखवले आहे.

https://www.instagram.com/p/CMl53ApDiFz/

खरेतर या व्हिडीओचा पहिला पार्ट हा एका व्हायरल व्हिडीओचा आहे. एका अवॉर्ड फंक्शनच्या रेड कार्पेटवर रितेश आणि प्रितीची भेट झाली होती. त्यावेळी त्या दोघांनी जेनेलियाला खुप इग्नोर केले. त्यावेळी जेनेलियाच्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे भाव उमटले होते. जेनेलियाच्या चेहऱ्यावरील तेच एक्सप्रेशन तिच्या चाहात्यांना खुप आवडले. जेनेलियाच्या चेहऱ्यावरील बदलते भाव हायलाइट करुन हा व्हिडीओ खुप व्हायरल झाला.

यामध्ये खोटे हसु चेहऱ्यावर ठेवले आहे असेच वाटते. आता जेनेलियाने एक नवा व्हिडीओ तयार केला आहे. त्यात तिने त्या अवॉर्ड फंक्शनवरुन परत आल्यावर रितेशचे काय हाल झाले ते दाखवले आहे. बायकोचा मार खाऊन रितेशची झालेली हालत ही खुप बघण्यासारखी आहे. या व्हिडीओच्या बैकग्राउंडला ‘तेरा नाम लिया, तुझे याद किया’ हे गाणे जोडले आहे.

तर दुसरीकडे स्केटींगल करताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे जेनेलियाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे सध्या तिला सगळ्या कामात तिचा नवरा रितेश देशमुख मदत करत आहे. हा व्हिडीओसुद्धा जेनेलियाने काही दिवसांपुर्वी शेअर केला होता. या व्हिडीओ रितेश जेनेलियाचे केस बांधताना दिसतो. रितेश आणि जेनेलिया हे बॉलिवुडमधील क्युट कपल म्हणुन ओळखले जातात. हे दोघेही अनेकदा सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *