विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना हा बॉलीवूडच्या उत्कृष्ट कलाकरांपैकी एक म्हणुन ओळखला जातो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये शानदार काम केले आहे. अक्षयने नुकताच त्याचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. २८ मार्च १९७५ ला अक्षयचा जन्म झाला होता. अक्षयचे करियर सुध्दा खूप शानदार राहिले. त्याने १९९७ मध्ये हिमालय पुत्र या चित्रपटातून पदार्पण केले होते. अक्षयच्या करियर सोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याची सुद्धा चर्चा व्हायची.

अक्षयचे करिश्मा कपूर सोबत लग्न ठरले होते हे खूप कमी लोकांना ठाऊक आहे. मात्र ते लग्न काही कारणास्तव होऊ शकले नाही. त्यानंतर अक्षयने कोणाशीच लग्न केले नाही. आज देखील अक्षय खन्ना अविवाहित आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्याशी संबधित काही गोष्टी सांगणार आहोत. हिमालय पुत्र या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर अक्षयने बॉर्डर हा ब्लॉकबस्टर चित्रपट केला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक सुद्धा झाले. त्यानंतर त्याला ताल या चित्रपटातून संपूर्ण भारतभर ओळख मिळाली.

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला ताल हा सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटात अक्षय सोबत ऐश्वर्या राय ने काम केले होते. या चित्रपटानंतर अक्षयने दिल चाहता है या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी अक्षयला फिल्मफेअरचा अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर त्याने हंगामा, हलचल, रेस , हमराज या चित्रपटांमध्ये काम केले. त्या दरम्यानच्या काळात अक्षयचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते मात्र त्याच्या लग्नाची चर्चा ही अभिनेत्री करिष्मा कपूर सोबत केली जात होती.

त्याकाळी करिष्मा ही टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जायची. करिष्मा चे वडील रणधीर कपूर यांनी विनोद खन्ना यांच्याकडे त्यांच्या मुलीचे स्थळ पाठवले होते. मात्र या नात्यामध्ये करिश्मा ची आई बबीता आली. त्याकाळी करिश्माचे करिअर सर्वात उंच शिखरावर असल्यामुळे तिने लग्न करून वेळ वाया घालवू नये असे तिच्या आईचे म्हणणे होते त्यामुळे तिने या लग्नाला नकार दिला होता.

एका मुलाखतीत जेव्हा अक्षयला त्याच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की मला लहान मुले आवडत नाही त्यामुळे मी लग्न केले नाही आणि यापुढेही करणार नाही. अक्षय ने सांगितले की त्याला एकटे राहायला आवडते. एखाद्या नात्यात मी खूप कमी वेळ राहू शकतो. माझे कोणतही रिलेशन जास्त काळ टिकल नाही. २०१७ मध्ये अक्षय चे वडील विनोद खन्ना यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. त्यानंतर अक्षय एकटा पडला.

हिरो आणि व्हिलन या दोन्ही भूमिका उत्कृष्ट पद्धतीने करता येत असल्यामुळे अक्षय खन्ना चे नाव बॉलीवूडच्या चांगल्या कलाकारांमध्ये घेतले जाते. अक्षयला सर्वात शेवटी सेक्शन ३७५ मध्ये पाहिला गेले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *