लहानबाळाच्या जन्मानंतर सर्वात महत्वाचे काम असते ते म्हणजे त्या बाळाचे नाव ठेवणे. प्रत्येक आईवडिल त्यांच्या बाळाचे सुंदर आणि खास नाव शोधुन काढतात. सर्वसामान्य लोकांसोबत बॉलिवुड सेलिब्रेटीसुद्धा त्यांच्या मुलांच्या नावासाठी गंभीर असतात. लहानपणापासुन लाइमलाइटमध्ये राहणाऱ्या या स्टारकिड्सची नाव युनिक असावीत असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे काही वेळेस या स्टारकिड्सची नाव अशी काही ठेवली जातात ज्यामध्ये त्याचा अर्थ समजणे कठीण होऊन जाते. काही दिवसांपुर्वीच करीना कपुर दुसऱ्यांदा आई झाली. तिला पुन्हा एकदा मुलगा झाला आहे. त्यामुळे तिचे चाहाते आता तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जाणुन घेण्यास उत्सुक आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखातुन बॉलिवुड कलाकारांच्या मुलांची नावे व त्याचा अर्थ सांगणार आहोत.
1. तैमुर अली खान – करिना कपुर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमुर हा जन्मापासुनच लाइमलाइटमध्ये राहिला आहे. तैमुर बीटाऊन मधील सर्वात चर्चित असा स्टारकिड आहे. मिडियासुद्धा त्याचा फोटो काढण्याची एकही संधी सोडत नाही. तैमुरच्या नावावरुन काही दिवसांपुर्वी खुप गोंधळ निर्माण झाला होता. तैमुरच्या नावाचा अर्थ हा फौजेमधला बहादुर असा असतो.
2. आराध्या बच्चन- बिग बींची नात आणि अभिषेक व ऐश्वर्याची मुलगी आराध्या बच्चन ही सुद्धा एक प्रसिद्ध स्टारकिड आहे. आराध्याच्या नावाचे दोन अर्थ आहेत. पहिला म्हणजे आराधना करण्याच्या लायक असणारा, ज्याची पुजा केली जाऊ शकते आणि दुसरा म्हणजे सर्वात पहिला.
3. नितारा- बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे दोघे त्यांच्या लेकीला म्हणजेच नितारा मिडीयाच्या नजरेपासुन नेहमी वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. निताराच्या लहानपणापासुनच अक्षय तिला कॅमेऱ्यापासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करत आला आहे. निताराचा अर्थ ज्याचे मुळ खुप खोल पसरले आहे. आणि जे जमिनीला जोडले गेले आहे.
4. मीशा कपुर – शाहिद आणि मिरा कपुर यांची मुलगी मीशा कपुर ही सुद्धा एक स्टारकिड आहे. मीशाचे नाव हे शाहिद आणि मीराच्या नावापासुन बनते. मीशाच्या नावाचा अर्थ देवासारखा किंवा देवाने दिलेली भेटवस्तु असा होतो.
5. रेने सेन- सुष्मिता ही एक सिंगल मदर आहे. तिने एक नाही तर दोन मुलींना दत्तक घेतले आहे. सुष्मिताने तिच्या मोठ्या मुलीचे नाव रेने असे ठेवले आहे. रेनेचा अर्थ पुर्नजन्म असा होतो.
6. न्यासा देवगण – बॉलिवुडचे सर्वात प्रसिद्ध कपल अजय देवगण आणि काजोल यांच्या मोठ्या मुलीचे नाव न्यासा देवगण असे आहे. हे नाव थोडे हटके आहे. याचा अर्थ लक्ष्य किंवा नवी सुरुवात असा होतो.
7. वियान कुंद्रा – शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याच्या मुलाचे नाव वियान असे आहे. वियानचा अर्थ खुलेआम जीवन जगणारा असा होतो.
8. इनाया खेमु – सैफ अली खानची बहिण सोहा अली खान आणि तिचा पति कुणाल खेमु यांच्या मुलीचे नाव इनाया नौमी खेमु असे आहे. इनाया हा कुराणातील शब्द आहे. याचा अर्थ मदत करणे किंवा काळजी करणे असा होतो.
9. सुहाना खान- सुहाना खानला कोण ओळखत नाही. शाहारुख खान आणि गौरी खानची लाडकी लेक सुहाना खान ही खुप प्रसिद्ध स्टारकिड आहे. फिल्म इंडस्ट्रिमध्ये येण्यापुर्वी ती तिच्या स्टाइलमुळे खुप प्रसिद्ध आहे. सुहानाचा अर्थ शुद्ध आणि चमकदार असा होतो.
10. अबराम- बॉलिवुडचा बादशहा शाहरुख खानच्या सर्वात लहान मुलाचे नाव अबराम खान असे आहे. अबरामचे नाव ठेवल्यावर हे नाव खुप चर्चेत होते. अबरामवर खुप प्रेम करणाऱ्या शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते की त्याच्या नावाचा अर्थ हा जेविश आणि हिंदु नावाचे मिश्रण आहे. हे नाव भगवान श्री रामांशी प्रेरित आहे.
11. वामिका- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या मुलीचे नाव वामिका असे ठेवले आहे. लोकांना या नावाचा अर्थ जाणुन घेण्याची खुप उत्सुकता लागली आहे. हे दुर्गा देवीचे नाव आहे. शिवाय ते विराटचा व आणि अनुष्काचा का या दोन अक्षरांनी तयार झाला आहे.
12. रायन आणि एरिन – माधुरी दिक्षित आणि श्रीराम नेने यांना रायन आणि एरिन ही दोन मुले आहेत. माधुरीच्या मोठ्या मुलाच्या म्हणजेच रायनच्या नावचा अर्थ हा स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग असा होतो तर छोटा मुलगा एरिनचा अर्थ शक्तीचा पर्वत असा होतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !