सिक्रेट हे कोणाचेही असु शकतात मग ते कोणी सर्वसामान्य व्यक्ती असो वा कोणी सेलिब्रेटी. तसे पहायला गेले तर सेलिब्रेटींच्या खासगी गोष्टी या अनेकदा जगासमोर येतात पण अशा ही काही गोष्टी आहेत ज्या ते कोणाशीही शेअर करु इच्छित नाही. मात्र त्याच्या चाहात्यांना त्यांच्या बद्दल प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्ट जाणुन घ्यायची असते. आज आम्ही तुम्हाला काही कलाकारांच्या सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत.

1. आलिया भट्ट – बॉलिवुडची चुलबुली गर्ल म्हणजेच आलिया भट्टने अगदी कमी काळात स्वताची वेगळी ओळख तयार केली आहे. तिच्या चाहात्यांची संख्या जगभर पसरली आहे. पण तुम्हाला माहित आहे का आलिया भट्टला अंधाराची भीती वाटते. त्यामुळे ती रात्री झोपतेवेळी तिच्या खोलीची लाइट चालु ठेवुनच झोपते.

2. सोनम कपूर – बॉलिवुडची स्टाइल आयकॉन म्हणुन प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्सने तिच्या चाहात्यांना कधीच निराश करत नाही. मात्र सोनम जास्त बिकनी घालत नाही. या गोष्टीचा खुलासा सोनमने एका शो दरम्यान केला होता कि तिचे शरीर बिकनीमध्ये चांगले दिसत नाही त्यामुळे ती बिकनी घालत नाही.

3. सलमान खान – विवादित तथा चर्चित टिव्ही शो कॉफी विथ करण मध्ये बॉलिवुडचा भाईजान सलमान खानने खुलासा केला होता की तो व*र्जि*न आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या गर्लफ्रेंण्डस् असुनपण सलमान खान व*र्जि*न कसा. पण काय बोलणार ही गोष्ट खुद्द सलमान खानने सांगितल्यामुळे ती खरी मानावीच लागणार कारण सलमान खानने एक बार जो कमिटमेंट कर दी फिर वो अपने आप की भी नहीं सुनते.

4. करिना कपुर खान – तुम्हाला माहित आहे का कि बॉलिवुडची सुपरस्टार आणि सध्याची टॉपची अभिनेत्री करिना कपुर खान तिची जिन्स अनेक आठवडे धुवत नाही. काही वेळेस तर तिला एक जीन्स घालुन महिना देखील होतो. पण तरीही ती तिची जिन्स धुवत नाही. विशेष म्हणजे ही गोष्ट करीनाने स्वता सांगितली होती.

5. गोविंदा – एकेकाळचा बॉलिवुडचा सुपरस्टार ज्याच्या डान्सचे अजुनही असंख्य लोक चाहाते आहेत. पण तुम्हाला माहित आहे का गोविंदाने एका इंटरव्ह्युमध्ये सांगितले होते की त्याचे लग्नानंतर बाहेरसुद्धा एक अफेअर होते. सेलिब्रिटींच्या चाहात्यांना अनेकदा त्यांच्या आवडीच्या कलाकारांच्या आयुष्यात काय चालले आहे यावर लक्ष असते. यावर गोविंदाने सांगितले कि फॅन्सला आमच्या वैयक्तिक आयुष्यावर नाही तर आमच्या अभिनयाशी देणघेण असलं पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *